ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिका विजयानंतर भारतीय संघासमोर आता दक्षिण आफ्रिकेच्या खडतर दौऱ्याचे आव्हान आहे. मात्र या दौऱ्यातही दमदार प्रदर्शन करण्याचा निर्धार धडाकेबाज सलामीवीर शिखर धवनने व्यक्त केला.  
‘‘आफ्रिकेतील वेगवान खेळपट्टय़ा माझ्या खेळाला साजेशा आहेत. या हंगामात आम्ही सातत्याने चांगले क्रिकेट खेळत आहोत आणि दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यातही आम्ही चांगले प्रदर्शन करू,’’ असे धवनने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘अ’ संघाचा भाग म्हणून मी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. त्यामुळे तेथील खेळपट्टय़ांवर खेळण्याचा मला सराव आहे. खेळपटय़ांशी जुळवून घेत फलंदाजी करणे आवश्यक आहे. सध्याचा चांगला फॉर्म कायम राखण्याची माझी इच्छा आहे.’’

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South africa tour could be shikhar dhawans career defining series