अमेरिकेतील रिचमंड खुल्या स्क्वॉश स्पर्धेत भारताच्या जोश्ना चिनप्पाने जेतेपदावर नाव कोरले. ऑस्ट्रेलियाच्या माजी विजेत्या आणि अव्वल मानांकित रचेल ग्रिनहमवर विजय मिळवत तिने जेतेपदाची कमाई केली. जोश्नाने ग्रिनहमवर ११-९, ११-५, ११-८ अशी सरळ गेम्समध्ये मात केली. ग्रिनहमविरुद्ध सहा सामन्यांमधील जोश्नाचा हा पहिला विजय ठरला. कारकिर्दीतील जोश्नाचे हे नववे जेतेपद ठरले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Squash joshna chinappa stuns former world no 1 to win