भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत हा मॅच फिक्सिंगमुळे गेली अनेक वर्षे चर्चेत होता. पण त्या आधी क्रिकेटच्या मैदानावर असताना तो त्याच्या विविध प्रकारच्या सेलिब्रेशनमुळे चर्चेत असायचा. श्रीसंत अनेकदा मैदानावरील बाचाबाचीत सहभागी असल्याचे दिसून आले. पण गोलंदाज असूनही त्याचे सर्वात लोकप्रिय सेलिब्रेशन हे फलंदाजी करत असताना झाले. दक्षिण आफ्रिके विरूद्ध खेळलेल्या सामन्यात श्रीसंतने सिक्स मारल्यानंतर बॅट फिरवून नाचल्याचे सेलिब्रेशन आजही क्रिकेट रसिकांना लक्षात आहे.

“गांगुलीच्या आधी भारतीय संघ विनम्र होता”

२००७ साली भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी पहिल्या कसोटी सामन्यात जोहान्सबर्ग येथे हा प्रसंग घडला. आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज आंद्रे नेल याने आधी श्रीसंतला बाऊन्सर चेंडू टाकला आणि त्याला डिवचलं. त्यानंतर रागात असलेल्या श्रीसंतने पुढच्याच चेंडूवर सरळ रेषेत एक जोरदार षटकार लगावला. त्यातही विशेष म्हणजे श्रीसंतने तो षटकार क्रीजमधून बाहेर येऊन खेचला होता. श्रीसंत षटकार मारण्यापर्यंत थांबला नाही. तो धावत नॉन स्ट्राइकवर आल्यानंतर त्याने बॅट हातात घुमवून झकासपैकी एक डान्स केला आणि आनंद साजरा केला.

Coronavirus मुळे क्रिकेटमध्ये होणार ‘हा’ मोठा बदल

श्रीसंतने नुकतीच एका क्रीडा वेबसाईटला मुलाखत दिली. इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून त्याने या आठवणीला पुन्हा एकदा उजाळा दिला. “आंद्रे नेल त्या दिवशी खूप बडबड करत होता. भारतीय संघातील खेळाडूंच्या धमक नाही. आफ्रिकेचा संघ उत्तम आहे, असे काही तरी तो बोलला. मला त्याला सांगायचं होतं की धावफलक बघ म्हणजे तुला कळेल कोणता संघ चांगला आहे. पण त्या दिवशी भारताकडून वरच्या फळीतील फलंदाज फारसा चांगला खेळ करू शकले नव्हते. मला गांगुलीने शर्ट काढून सेलिब्रेशन केलेलं लक्षात होतं. मी जेव्हा नेलला सिक्स मारला, तेव्हा मी गांगुलीचीच क्रिया शर्टाऐवजी बॅटने केली आणि नाचत सेलिब्रेशन केलं. त्यानंतर मी त्या पूर्ण मालिकेत नेलच्या गोलंदाजीवर बाद झालो नाही. पुढच्या कसोटीतदेखील मी त्याला तीन चौकार लगावले पण त्यावेळी मी नाचलो नाही”, असे श्रीसंत म्हणाला.