टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यामध्ये भारतीय सलामीवीरांना फारशी चमक दाखवता आली नाही. के. एल. राहुल अवघ्या पाच धावा करुन तंबूत परतला तर रोहित शर्माही टी-२० सामन्याला साजेशी खेळी करण्यात अपयशी ठरला. २८ चेंडूंमध्ये २७ धावांची खेळी करुन रोहित तंबूत परतला. मात्र या दोघांवर भारतीय क्रिकेट चाहते चांगलेच संतापले आहेत. रोहितने तर कसोटीमधील खेळी केल्याचं म्हणत चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.

नक्की पाहा >> Ind vs Eng: ६ धावा करणाऱ्या पंतच्या एका निर्णयानं भारताला मिळाल्या १० धावा, सर्वांकडून होतंय कौतुक; पाहा Video

भारताला या संपूर्ण मालिकेमध्ये कर्णधार रोहित शर्माच्या कामगिरीची चिंताच असल्याचं दिसून आलं. नेदरलँड्सविरुद्धचे अर्धशतक वगळता रोहितला धावांसाठी झगडावे लागले आहे. रोहितचा हाच सुमार फॉर्म इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात दिसून आला. २८ चेंडूंमध्ये २७ धावा करुन के. एल. राहुल पाठोपाठ रोहितही तंबूत परतला. सामन्यातील नवव्या षटकामध्ये रोहित क्रिस जॉर्डनच्या गोलंदाजीवर सॅम करनकडे झेल देऊन बाद झाला. २८ चेंडूंमध्ये २७ धावा करत टी-२० मध्ये कसोटी खेळणाऱ्या रोहितचं अभिनंदन, असं एक जुना फोटो शेअर करत चाहत्याने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Ind vs Eng: “केएल राहुल म्हणजे सर्वात मोठा Fraud, महत्त्वाच्या सामन्यांमध्ये धावा काढत नाही आणि संघाला…”

१) रोहितची खेळी सुरु होताच संतपली

२) कसोटी खेळल्याबद्दल अभिनंदन

३) चला निघतो

४) तीन चेंडूंनंतर एक चौकार मारत होता

५) नेमका तो काय करत होता हा प्रश्नच

६) शून्यावर बाद झाला असता तर अधिक फायदा झाला असता

७) त्यांना लंचपर्यंत खेळायचं होतं…

रोहितपूर्वी के. एल. राहुल फलंदाजीला मैदानात उतरल्यानंतर सामन्याच्या १० व्या चेंडूवर बाद झाला. त्यामुळे त्याच्याविरोधातही अनेकांनी सोशल मीडियावरुन संताप व्यक्त केला आहे.