टी-२० विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला मोठ्या फरकाने पराभूत केलं आहे. आज झालेल्या सामन्यामध्ये पावसाने व्यत्यय आणल्याने पाकिस्तानला अप्रत्यक्षपणे फायदा झाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना पाकिस्तानने डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीने ३३ धावांनी जिंकला. या विजयामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान कायम असून भारताचं मात्र टेन्शन वाढलं आहे. बुधवारी बांगलादेशाचा संघर्षपूर्ण लढतीत ५ धावांनी पराभव करत उपांत्यफेरीतील मार्ग सुखकर केला असला तरी नेट रन रेटच्या बाबतीत भारत पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिकेहून मागे आहे. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान सामन्यानंतर भारत दुसऱ्या गटामध्ये अव्वल स्थानी असला तरी उपांत्यफेरीमध्ये कोणता संघ जाणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. त्यातच पाकिस्तानच्या या मोठ्या विजयामुळे या गटातील चुरस अधिक वाढली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नक्की वाचा >> विराटने ‘फेक फिल्डींग’ केली म्हणजे नेमकं काय केलं? त्याच्यावर कारवाई होऊ शकते का? भारताला बसणार का फटका?

पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात घडलं काय?
पाकिस्तानने निर्धारित २० षटकांमध्ये १८५ धावांपर्यंत मजल मारल्यानंतर धावांचा पाठलाग करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ अगदी सहाव्या षटकापर्यंत डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीच्या आकडेमोडीनुसार आघाडीवर होता. मात्र नंतर एकामागोमाग पडलेल्या विकेट्स आणि पावसामुळे सामना १४ षटकांचा खेळवायला लागल्याने दक्षिण आफ्रिकेचा पराभव झाला. पावसामुळे काही वेळ खेळ थांबल्यानंतर पुन्हा खेळाडू मैदानावर उतरले तेव्हा डकवर्थ-लुईस-स्टेन पद्धतीनुसार दक्षिण आफ्रिकेसमोर पाच षटकांमध्ये ७३ धावांचं आव्हान ठेवण्यात आलं होतं. मात्र ३० चेंडूंमध्ये दक्षिण आफ्रिकेला यापैकी ४० धावाच करता आल्या. पाकिस्तानी गोलंदाजांनी टिचून गोलंदाजी केली आणि वेगाने धावा करण्याच्या प्रयत्नात दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा डाव गडगडल्याचं दिसून आलं.

दोन स्थानांनी पाकिस्तानची झेप…
या सामन्यानंतर गुणतालिकेमध्ये पाकिस्तानने दोन स्थानांनी झेप घेतली असून पाकिस्तान या विजयासहित तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. तर पराभूत झालेला दक्षिण आफ्रिकेचा संघ आहे त्याच ठिकाणी म्हणजे दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ सर्वाधिक गुणांसहीत म्हणजेच ६ गुणांसहीत अव्वल स्थानी असला तरी नेट रन रेटच्या बाबतीत अव्वल तीनमध्ये तिसऱ्या स्थानी आहे.

नक्की वाचा >> गोलंदाजाच्या हाताने स्टम्प पडल्यानंतरही कार्तिकला Ind vs Ban सामन्यात धावबाद घोषित का केलं? समजून घ्या यामागील कारण

पाकिस्तानचा नेट रन रेट भारताहून सरस
चारपैकी एका सामन्यात पराभव झाल्याने भारताच्या नावावर सहा गुण असून भारताचा नेट रन रेट हा +०.७३० इतका आहे. नेट रन रेटच्याबाबतीत पाकिस्तान भारताच्या पुढे आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन दोन गुण मिळवले असून या विजयासहित बाबर आझमच्या नेतृत्वाखालील संघाने तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. आपले पहिले दोन्ही सामने पाकिस्तानने अंतिम चेंडूवर गमावल्याने त्याचा नेट रन रेट भारताहून अधिक सरस आहे.

नक्की वाचा >> Ind vs Ban: बॅट, बॉलऐवजी हातात ब्रश घेत ‘त्याने’ भारतीय संघाला जिंकून दिला सामना; जाणून घ्या या व्यक्तीनं नेमकं केलं तरी काय

कोण कोणत्या स्थानी आणि स्पर्धा कोणामध्ये…
दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट हा १.४४१ इतका असून एक सामना न झाल्याने वाटून दिलेला गुण आणि दोन सामन्यांमधील विजयामुळे त्यांचे एकूण पाच गुण आहेत. पाकिस्तान विरुद्धचा सामना पराभूत झाल्याने त्यांना नेट रन रेटमध्ये मोठा फटका बसला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याआधी दक्षिण आफ्रिकेचा नेट रन रेट हा २.७७२ इतका होता. पात्रतेच्या फेरीमध्ये बांगलादेशही शर्यतीत दिसत आहे. बंगलादेशच्या नावावरही पाकिस्तानप्रमाणेच चार गुण असून त्यांचा नेट रन रेट हा उणे १.२७६ इतका आहे. या स्पर्धेमध्ये दुसऱ्या गटातून झिम्बाब्वे आणि नेदरर्लण्ड्स बाहेर पडल्यात जमा आहे. प्रत्येक गटामधून दोन संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी दुसऱ्या गटातून भारत, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यामध्ये अंतिम दोन स्थानांसाठी चुरस दिसून येत आहे.

नक्की वाचा >> विश्लेषण: नेट रन रेटवर पाकिस्तान In की Out ठरणार? पण NRR कॉलमखाली दिसणारा ‘नेट रन रेट’ म्हणजे काय? तो कसा मोजतात?

पाहा T20 World Cup Points Table Group 2:

पाकिस्तानला हवा मोठा विजय…
बांगलादेशवर संघर्षपूर्ण विजय मिळविल्यानंतर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित नाही, तर फक्त सुकर झाला आहे. उपांत्य फेरीतील प्रवेशावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भारताला झिंम्बाब्वेवर विजय आवश्यक आहे. भारत सध्या गटात आघाडीवर आहे. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करुन अजून आपला आशा कायम ठेवल्या आहेत. आता त्यांना त्यांच्या सुपर १२ मधील शेवटच्या सामन्यामध्ये बांगलादेशवर मोठा विजय मिळवणं आवश्यक आहे.

नक्की पाहा >> Ind vs Ban: के. एल. राहुलचा हा थ्रो ठरला सामन्याचा टर्निंग पॉइंट; Rain Break नंतर दुसऱ्याच चेंडूवर काय घडलं पाहा Video

…तर पाकिस्तान ठरेल सरस
पाकिस्तान आज दक्षिण आफ्रिकेकडून पराभूत झाला असता तर भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश अधिक सुखकर झाला असता आणि पाकिस्तानचे आव्हान संपुष्टात आलं असतं. पाकिस्तानच्या पराभवामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतावर कमी प्रेशर असतं. मात्र पाकिस्तानने सुपर १२ फेरीतील आपला उर्वरित सामना मोठ्या फरकाने जिंकला आणि झिम्बाब्वेने रविवारी भारताला हरवले तर नेट रन रेटच्या आधारे पाकिस्तान गुणतक्त्यात भारताच्या पुढे जाईल. मात्र आजच्या सामन्यानंतर गुणांच्या आधारे तरी पाकिस्तान भारताच्या खालीच आहे. पाकिस्तानने बांगलादेशविरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकला तर नेट रन रेट वाढवण्याबरोबरच त्यांचे सहा गुण होतील आणि ते भारताहून सरस ठरतील.

नक्की वाचा >> Ind vs Ban: पाऊस सुरु होण्याच्या तीन चेंडूंआधी विराटच्या त्या एका कृतीमुळे भारताने गमावला असता सामना? ‘त्या’ धावा चर्चेत

…अन् पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका पात्र ठरतील
नेदरलॅंड्सनी अखेरच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवले किंवा पावसामुळे सामनाच झाला नाही, तर पाकिस्तान नेट रन रेटच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेलाही मागे टाकू शकेल. बांगलादेशने पाकिस्तानला हरवल्यास ते देखील स्पर्धेत राहतील. पण बांगलादेशला पात्र ठरण्यासाठी झिम्बाब्वेने भारताला हवरणे आवश्यक असेल. अर्थात, अशा वेळी बांगलादेशला नेट रन रेटचा फटका बसू शकतो पण त्याचा फायदा पाकिस्तानला होईल. भारत झिम्बाब्वे विरुद्ध पराभूत झाल्यास उपांत्यफेरीत जाण्याच्या भारताच्या आशा फारच धुसर होतील आणि पाकिस्तान व दक्षिण आफ्रिका उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील.

नक्की पाहा >> Ind vs Ban: बांगलादेशने दिनेश कार्तिकची विकेट ढापली? ‘थर्ड अंपायर आंधळा आहे का?’ चाहत्यांचा Video शेअर करत प्रश्न

भारताचा एकमेव सामना शिल्लक
भारताच्या हातात आता रविवारी होणारा झिम्बाब्वेविरुद्धचा एकमेव सामना शिल्लक आहे. झिम्बाब्वेला लिंबू-टिंबू संघ समजणं पाकिस्तानप्रमाणे भारतालाही महागात पडू शकतं. त्यामुळेच भारत या सामन्यामध्येही मोठ्या विजयासहित उपांत्यफेरीत आपलं स्थान पक्क करण्याच्या निर्धारानेच मैदानात पाऊल ठेवेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: T20 world cup points table group 2 after pakistan defeated south africa with big margin pak vs sa result team india scsg