क्रिकेट हा एक अत्यंत रोमांचक खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावर अनेक आश्चर्यकारक विक्रम घडतात. त्याबरोबरच अनेक चमत्कारिक गोष्टी घडल्याचेही पाहायला मिळते. पण इंग्लंडमध्ये झालेल्या एका सामान्य दरम्यान भारतीय चाहत्यांनी चक्क मैदानावर रिक्षा आणल्याची घटना घडली. ही गोष्ट पाहून साऱ्यांनीच तोंडात बोटं घातली. कारण असे क्रिकेटच्या मैदानावर प्रथमच घडले.

भारताचा अधिकृत चाहता वर्ग असलेला ‘भारत आर्मी’ यांच्याविरुद्ध ‘बर्मा आर्मी’ यांच्यात एक क्लब क्रिकेट सामना रंगला होता. सामान्यात दरम्यान विश्रांतीचा ड्रिंक्स ब्रेक घेण्यात आला. या कालावधीत भारताच्या चाहत्यांनी चक्क रिक्षातून मैदानावर पाणी आणले आणि खेळाडूंना पाणी दिले. ही व्हिडीओ भारत आर्मीने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून पोस्ट केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या व्हिडीओखाली ‘बीसीसीआय’ला उद्देशून संदेश दिला आहे.

बीसीसीआय, ड्रिंक्स ब्रेक दरम्यान पाणी देण्याची ही नवीन पद्धत आहे. तुम्ही याची नोंद घेत आहात का? असा संदेश यासोबत नमूद केले आहे.