महिलांचा पहिला सामना कॅनडाशी

वृत्तसंस्था, बँकॉक : ‘बीडब्ल्यूएफ’ थॉमस आणि उबर चषक बॅडिमटन स्पर्धेतील भारताच्या दोन्ही संघांच्या मोहिमेला रविवारपासून प्रारंभ होणार आहे. क-गटातील पुरुष संघाची सलामी जर्मनीशी, तर ड-गटातील महिलांची कॅनडाशी पहिली लढत कॅनडाशी होणार आहे.

बँकॉक येथे ८ ते १५ मे या कालावधीत ही स्पर्धा होणार असून, भारताची धुरा किदम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि पीव्ही सिंधू यांच्यावर असेल. पुरुषांच्या थॉमस चषक स्पर्धेत इंडोनेशियाचा संघ बलाढय़ मानला जातो. त्यांनी आतापर्यंत १४ जेतेपदे पटकावली आहेत. याचप्रमाणे महिलांच्या उबर चषक स्पर्धेत चीनने सर्वाधिक १५ जेतेपदे जिंकून आपले वर्चस्व राखले आहे. गतवर्षी आरहस (डेन्मार्क) येथे झालेल्या थॉमस चषक स्पर्धेत इंडोनेशियाने आणि उबर चषक स्पर्धेत चीनने विजेतेपद पटकावले होते.

थॉमस चषक भारतीय संघ –

  •   एकेरी : लक्ष्य सेन, किदम्बी श्रीकांत, एचएस प्रणॉय, प्रियांशू राजावत
  •   दुहेरी : सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी, चिराग शेट्टी, एमआर अर्जुन, ध्रुव कपिला, कृष्ण प्रसाद गरगा, विष्णुवर्धन गौड पंजाला.
  •   सामने

८ मे वि. जर्मनी

९ मे वि. कॅनडा

११ मे वि. चायनीज तैपेई

उबर चषक भारतीय संघ –

  •   एकेरी : पीव्ही सिंधू, आकर्षी कश्यप, अश्मिता चलिहा, उन्नती हुडा
  •   दुहेरी : सिमरन सिंघी, रितिका ठाकर, तनिषा क्रॅस्टो, श्रुती मिश्रा
  •   सामने

८ मे वि. कॅनडा

१० मे वि. अमेरिका

११ मे वि. कोरिया

दुखापतीमुळे गायत्रीची स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारताची उदयोन्मुख दुहेरी बॅडिमटनपटू गायत्री गोपीचंदने दुखापतीमुळे आगामी उबर चषक बॅडिमटन स्पर्धेतून माघार घेतली आहे. भारतीय बॅडिमटन संघटनेचे सचिव संजय मिश्रा यांनी गायत्रीबाबत माहिती दिली. त्रिसा जॉलीच्या साथीने गायत्री देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लक्षवेधी कामगिरी करीत आहे. आशिया अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेतूनही गायत्री-त्रिसा जोडीने दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यामुळे सिमरन सिंघी, रितिका ठाकर, तनिषा क्रॅस्टो, श्रृती मिश्रा यांच्यावर भारताची धुरा असेल.