Video of Bangladesh cricketer walking on fire goes viral: आशिया कप २०२३ स्पर्धेला ३० ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. बांगलादेश संघाला एकदाही आशिया चषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही, हा संघ पहिल्या विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. आशिया कप २०२३ साठी बांगलादेश संघाची तयारीही अंतिम टप्प्यात आहे. याआधी एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्याने क्रिकेट चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बांगलादेशी क्रिकेटर आगीवर अनवाणी चालताना दिसला –

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बांगलादेशचा खेळाडू मोहम्मद नईम शेख आगीवर अनवाणी चालताना दिसत आहे. हा व्हिडीओ माइंड ट्रेनिंगचा एक भाग मानला जात आहे. या व्हिडीओमुळे सोशल मीडियाचे चाहते आश्चर्यचकित झाले असले, तरी लोक म्हणत आहेत की हा क्रिकेटर बंगालची काळी जादू करतोय, त्याने यापेक्षा आपल्या खेळावर लक्ष केंद्रित केले असते तर बरे झाले असते.

आशिया कपमध्ये बांगलादेशचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध –

आशिया कप २०२३ मध्ये बांगलादेशचा पहिला सामना श्रीलंकेविरुद्ध आहे. बांगलादेशचा पहिला सामना ३१ ऑगस्ट रोजी श्रीलंकेविरुद्ध होणार आहे. ३ सप्टेंबरला संघाचा दुसरा सामना होणार आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी बांगलादेश संघाने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. त्यामुळे लवकरच संघाची घोषणा होऊ शकते.

हेही वाचा – Asia Cup 2023: टीम इंडियाच्या मिडल ऑर्डरसाठी सूर्या-किशन सर्वोत्तम पर्याय, माजी निवडकर्त्याने केला दावा

आशिया चषक हा हायब्रीड मॉडेलमध्ये खेळवला जात आहे –

आशिया चषक २०२३ हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केला जात आहे. पाकिस्तान ग्रुप स्टेजचे तीन सामने आणि सुपर फोर टप्प्यातील एक सामना आयोजित करेल. उर्वरित सामने श्रीलंकेत खेळवले जातील. ३० ऑगस्टला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात सलामीची लढत होणार आहे. हा सामना मुलतानमध्ये होणार आहे. भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कँडी येथे होणार आहे. अंतिम सामना १७ सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये खेळवला जाईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of bangladesh cricketer mohammad naeem sheikh walking barefoot on fire goes viral vbm