Rishabh Pant Cried Over Dhoni Chants: टीम इंडियाचा यष्टिरक्षक व फलंदाज ऋषभ पंतने मोहालीतील टी-20 सामन्यादरम्यान विकेटकीपिंग दरम्यान चूक केल्यावर स्टेडियममधील चाहत्यांनी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या नावाचा जप सुरु केला होता. चाहत्यांनी अशाप्रकारे ऋषभला चिडवण्याची ही पहिलीच वेळ नाही. खरंतर धोनीचे फॅन फॉलोईंग प्रचंड आहे आणि जेव्हा सुरुवातीला धोनीच्या जागी ऋषभ मैदानात उतरू लागला तेव्हाही त्याला अशाच प्रकारे ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. धोनीची संघातील पोकळी भरून काढण्यासाठी जेव्हा त्याच्याकडून चुका झाल्या तेव्हा सुद्धा ऋषभला टीकेची झोड सहन करावी लागली होती. या सगळ्या प्रकरणाबाबत स्टार स्पोर्ट्सशी बोलताना ऋषभ पंतने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२५ वर्षीय ऋषभने सांगितले की, “मोहालीमध्ये सतत धोनीच्या नावाचा जप होत असताना नक्कीच मला खूप वाईट वाटायचं. माझ्यावर दडपण नव्हतं पण धोनीने पार पाडलेली जबाबदारी आपली खांद्यावर घेताना इतका दबाव होता की मला श्वास घेणं सुद्धा कठीण व्हायचं. मला समजत नव्हतं की २०-२१ वर्षांचा एक तरुण खेळाडू मैदानात आल्यावर लोक असं का बोलत आहेत. काहींनी ५ सामने खेळलेले असतात काहींनी ५०० पण या दोघांची तुलना होऊच शकत नाही. प्रत्येकाचा प्रवास खूप चढ- उतारांचा असतो. मला तेव्हा खूप वाईट वाटायचं मी कित्येकदा खोलीत जाऊन रडलो आहे.”

धोनी व ऋषभ पंतचं नातं कसं आहे?

दरम्यान, ऋषभ पंतने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनीसह आपल्या नात्याबद्दल सुद्धा काही खास खुलासे केले आहेत. तो म्हणाला की, “मी धोनीशी कोणत्याही विषयावर चर्चा करू शकतो आणि काही विषयांवर तर धोनी भाई शिवाय इतर कोणाशीही मी चर्चा करूच शकत नाही. मी त्यांच्याकडून खूप शिकलो आहे. एकदा प्रशिक्षणादरम्यान, मी त्यांना सांगितले की मी आयपीएल मध्ये मी चांगलं खेळू शकतो पण जेव्हा आंतरराष्ट्रीय सामने येतात तेव्हा मी चुकतो तर मी यावर काय करू? त्यावर ते मला नेहमी सांगायचे की तू प्रत्येक सामन्यात आंतरराष्ट्रीय सामना खेळतोय अशीच मानसिकता ठेव. यावर मी त्यांना हसून एवढंच म्हणायचो की, तुम्ही महान आहात पण तुमच्या महानतेचा सगळा दबाव माझ्यावरच येतोय. हा अन्याय आहे. आणि मग आम्ही हसायचो. “

हे ही वाचा << Video: सचिन ‘तेंडुलकर’ला भेटतो तेव्हा…! खुद्द मास्टर ब्लास्टरनंच शेअर केला व्हिडीओ; चाहत्याच्या चेहऱ्यावर तरळल्या लाखमोलाच्या भावना

दुसरीकडे, डिसेंबर २०२२ मध्ये नवीन वर्षात झालेल्या जीवघेण्या अपघातानंतर ऋषभ पंत सध्या रिकव्हरी मोडवर आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामात तो स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी अपेक्षा आहे. आयपीएल २०२४ साठी दिल्ली कॅपिटल्सने त्याला कायम ठेवले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video rishabh pant emotional says i cried over dhoni chants after every mistake says i could not breathe relation with ms dhoni svs
First published on: 02-02-2024 at 17:39 IST