आयपीएल २०२१ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यानंतर विराट कोहलीचं आयपीएल जिंकण्याचं स्वप्न भंगलं आहे. आता विराट कोहलीच्या नजरा टी २० विश्वचषकाकडे खिळल्या आहेत. टी २० विश्वचषकानंतर विराट कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देणार आहे. त्यामुळे हा विश्वचषक जिंकत कर्णधारपदाचा शेवट गोड करण्याचा विराट कोहलीचा मानस आहे. असं असताना विराट कोहलीने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोतून बायो बबल जीवनशैली दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फोटोत भारतीय कर्णधार विराट कोहलीला एका खुर्चीला बांधलेलं आहे. हा फोटो सेटवरचा असल्याचं स्पष्ट दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि हताश दिसत आहे. कोहलीने याची तुलना बायो बबलशी केली आहे. “बायो-बबलमध्ये खेळताना असं वाटतं”, अशी कॅप्शन त्याने लिहीली आहे. या फोटोवर इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसननं आपल्या शैलीत कमेंट्स दिली आहे. “खेळाडू / प्रसारकांनी आपलं काम पूर्ण केलं आहे. खूपच चांगला फोटो”, अशी कमेंट्स पीटरसननं दिली आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेतील १५ सामन्यात विराट कोहलीने २८.९२ सरासरीने ४०५ धावा केल्या आहेत. यात तीन अर्धशतकांचा समावेश आहे. दुसरीकडे वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virat kohli share photo and describe life of bio bubble rmt