भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग करोना पीडितांना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याने हजारो गरजूंना घरगुती भोजन विनामूल्य दिले होते. आता त्याने देशातील करोना पीडितांसाठी आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सेहवागने ९०२४३३३२२२ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. या नंबरवरून करोना संक्रमित व्यक्तीचे नातेवाईक व्हॉट्सअ‍ॅपवर संदेश पाठवून ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची सुविधा मिळवू शकतात. वीरेंद्र सेहवागने आपल्या ट्विटर अकाउंटवर यासंबंधी एक व्हिडिओ शेअर केला आहे.

सेहवाग या व्हिडिओत म्हणतो, “नमस्कार मित्रांनो, आज एक गोष्ट सांगणार आहे. माझा जवळचा मित्र होता. २-३ आठवड्यांपूर्वी त्याचा अचानक फोन आला. त्याचा आवाज ऐकून मला असे वाटले की काही झाले नाही, तर कदाचित हा मित्र आपल्याला सोडून जाईल. बर्‍याच ठिकाणी फोन केला. २-३ तासांनंतर एक ऑक्सिजन कॉन्सट्रेटर उपलब्ध झाला. मी यापूर्वी कॉन्सट्रेटरचे नावही ऐकले नव्हते. ही गोष्ट ऑक्सिजनची पातळी सामान्य करण्यासाठी मदत करते.”

 

“अनेक निरुपयोगी लोकांनी काळाबाजार करून ५०-६० हजार किमतीची ही वस्तू २-३ लाखांना विकली आहे. गरीब माणूस सतत पैसे जमा करत राहिला आणि अनेक जीव गमवावे लागले. असे कोणासोबतही होऊ नये. दिल्लीत आम्ही एक विनामूल्य ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची बँक तयार केली आहे. जर तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला नितांत गरज असेल तर तुम्ही ते वापरू शकता आणि गरज संपल्यानंतर ते परत देऊ शकता, जेणेकरून दुसऱ्याला त्याचा फायदा होईल.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Virender sehwag releases a help line number to get free oxygen concentrator adn