उत्कंठापूर्ण लढतीत नेदरलँड्सच्या अनिष गिरीने माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदला बरोबरीत रोखले. या बरोबरीमुळे आनंदचे जागतिक आव्हानवीर बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल स्थान घेण्याच्या आशा दुरावल्या आहेत. या स्पर्धेत विजेतेपद मिळविण्यासाठी आनंदला शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये विजय मिळविणे अनिवार्य होते. या बरोबरीनंतर तेराव्या फेरीअखेर आनंदचे सात गुण झाले आहेत. शेवटच्या फेरीत आनंदसमोर पीटर स्विडलरचे आव्हान आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viswanathan anand