वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील २९९ धावसंख्येला तगडे आव्हान देताना इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३७३ अशी धावसंख्या उभारून ७४ धावांची आघाडी घेतली आहे. जो रूटने कारकीर्दीतील सहावे शतक झळकावत यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
अँटिग्वाच्या पहिल्या अनिर्णीत कसोटीत अर्धशतक साकारणाऱ्या २४ वर्षीय रूटने १६५ चेंडूंत नाबाद ११८ धावांची महत्त्वपूर्ण खेळी उभारली. यात १३ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. रूटने गॅरी बॅलन्स (७७) सोबत चौथ्या विकेटसाठी १६५ धावांची बहुमोल भागीदारी उभारली.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2015 रोजी प्रकाशित
रूटचे शतक; इंग्लंडचा वरचष्मा
वेस्ट इंडिजच्या पहिल्या डावातील २९९ धावसंख्येला तगडे आव्हान देताना इंग्लंडने दुसऱ्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३७३ अशी धावसंख्या उभारून ७४ धावांची आघाडी घेतली आहे.
First published on: 25-04-2015 at 03:29 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies v england joe root century puts tourists in charge