Rohit Sharma Trolled Due to Ritika’s Comment: वेस्ट इंडिज दौऱ्यावरील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकल्यानंतर टीम इंडियाचे खेळाडू आनंदी दिसत आहेत. डॉमिनिकामधील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा खूपच खूश आहे. रोहितने शनिवारी त्याच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट टाकली तेव्हा हे दृश्य पाहायला मिळाले. या पोस्टवर त्याची पत्नी रितिका सजदेहने मजेशीर उत्तर देत भारतीय कर्णधाराला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खरंतर, कर्णधार रोहित शर्माने त्याच्या इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट पोस्ट केली आहे, ज्यामध्ये तो फोनवर कोणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. त्याने त्याच्या फोटोला खूप मजेदार कॅप्शन दिले आहे. रोहितने कॅप्शनमध्ये ‘बाजीगर’ चित्रपटाचा एक डायलॉग दिला आहे. त्याने लिहिले, “अनारकलीचा फोन आला होता. आईस्क्रीम खाणे खूप महत्वाचे आहे.”

रोहितचे कॅप्शन बाजीगर या चित्रपटातून घेतले आहे, ज्यात जॉनी लीव्हरने हा प्रसिद्ध डॉयलॉग बोलला होता. या चित्रपटात जॉनी लीव्हरने या चित्रपटात विसरभोळ्या नोकराची भूमिका केली होती. रोहितच्या या पोस्टवर पत्नी रितिकाने मजेशीर कमेंट केली आहे. तिने आपल्या कमेंटने चाहत्यांना आश्चर्यचकित केले. रितिकाने कमेंट बॉक्समध्ये लिहिले की, “पण तू माझ्याशी बोलत होतास आणि कॉफी मशीन ठीक आहे का ते विचारत होतास.”


वेस्ट इंडिज दौऱ्यावर रोहित शर्माच्या फलंदाजीबद्दल बोलायचे, तर त्याने यशस्वी जैस्वालसह पहिल्या विकेटसाठी २०० हून अधिक धावांची भागीदारी केली होती, ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून १०३ धावांची पाहिला मिळाली. यासह त्याने कसोटी क्रिकेटमधील १०वे शतक झळकावले. त्याचवेळी, यशस्वी जैस्वालने पदार्पणाच्या कसोटीत १७१ धावा करत विक्रमांची रांग लावली.

हेही वाचा – Asian Games 2023: ‘आमचे स्वप्न देशासाठी…’; टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ऋतुराजची प्रतिक्रिया

वेस्ट इंडिजला पहिल्या डावात १५० धावांत गुंडाळल्यानंतर, रोहित आणि यशस्वी यांच्या शतकाच्या जोरावर भारताने ४२१/५ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. याला प्रत्युत्तर देताना यजमान संघाला दुसऱ्या डावात केवळ १३० धावा करता आल्या. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना २० जुलैपासून त्रिनिदाद टोबॅगो येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाणार आह

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wife ritika sajdeh made a funny comment on rohit sharmas instagram post vbm