अग्रमानांकित नोवाक जोकोवीच, चौथा मानांकित रॉजर फेडरर यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आव्हान राखले.
जोकोवीच याने फ्रान्सच्या गिलेस सिमोन याच्यावर ६-४, ६-२, ६-४ अशी मात केली. फेडरर या माजी विजेत्या खेळाडूने गिलेस म्युलर (लक्झेंबर्ग) याचा ६-३, ७-५, ६-३ असा पराभव केला. रॅफेल नदाल या द्वितीय मानांकित खेळाडूने लुकास रोसोल याच्यावर ६-४, ७-६ (८-६), ६-४, ६-४ असा संघर्षपूर्ण विजय मिळविला.
केविन अँडरसन याने अपराजित्व राखताना फॅबिओ फोगनानी याच्यावर निसटता विजय मिळविला.
अतिशय रंगतदार झालेली ही लढत त्याने ४-६, ६-४, २-६, ६-२, ६-१ अशी जिंकली. जो विल्फ्रेड त्सोंगा याने जिमी वोंग या चीन तैपेईच्या खेळाडूवर ६-२, ६-२, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळविला.
तृतीय मानांकित सिमोना हॅलेप हिने लेसिया त्सुरेको (युक्रेन) हिच्यावर ६-३, ४-६, ६-४ अशी मात केली.
अन्य लढतीत कॅरोलीन वोझ्नियाकी हिने क्रोएशियाच्या अॅना कोंजूम हिचे आव्हान ६-३, ६-० असे संपुष्टात आणले. एकतेरिना माकारोवा हिने कॅरोलीन गार्सिया हिला ६-३, ६-० असे सहज हरविले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Jun 2014 रोजी प्रकाशित
जोकोव्हिच, फेडररची आगेकूच
अग्रमानांकित नोवाक जोकोवीच, चौथा मानांकित रॉजर फेडरर यांनी विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेत आव्हान राखले.
First published on: 28-06-2014 at 01:54 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wimbledon 2014 novak djokovic federer advances to fourth round