सुटय़ा लागल्या की काय करू आणि काय नको असे मुलांना आणि त्यांच्याबरोबर पालकांनाही होते. सगळ्या उरल्यासुरल्या बेतांची यादीच तयार होत जाते. चला करू या सुटीचे नियोजन.
साहित्य :
आइस्क्रीमच्या काडय़ा २, एक जुनी रिकामी काडेपेटी, कार्डपेपर, कात्री, पुठ्ठा, गम, स्केच पेन.
कृती
- एक जुनी रिकामी काडेपेटी घेऊन तिचे दोन्ही भाग वेगळे करा. चारही बाजूंना कार्ड पेपर चिकटवून काडेपेटीला नवे रूप द्या.
- खोलगट आतील बाजूस छोटा पुठ्ठा चिकटवा.
- कार्ड पेपरची काडेपेटीत मावेल एवढय़ा रुंदीची एक पट्टी घेऊन ती झिगझ्ॉग (कागदी पंखा बनवण्यासाठी दुमडतात त्या प्रमाणे) करून दुमडा.
- दुमडलेल्या पट्टीचे एक टोक काडेपेटीच्या आतील भागात चिकटवा.
- पट्टीचा उर्वरित भाग तसाच मोकळा सोडा.
- आइस्क्रीमच्या दोन काडय़ा समांतर उभ्या धरा आणि त्यावर माचिसचे दोन भाग वर व खाली चिकटवा.
- वरील भागावर तुम्हाला हवे ते शीर्षक लिहा.
- खाली चिकटवलेल्या डबीतील कागदावर सर्व कुटुंबीयांना त्यांचे सुट्टीचे बेत लिहायला सांगा.
- अशा प्रकारे घरातील सर्वाच्याच सुटीचे नियोजन घरातल्या वाया जाणाऱ्या साहित्यापासून करता येऊ शकले.
- घरात सर्वाच्या सहज नजरेस पडेल, अशा ठिकाणी ही कलाकृती ठेवा, म्हणजे सतत स्मरण राहिली आणि कोणताही बेत राहून जाणार नाही.
- सगळ्यांची सुट्टी आनंदात जावो.
apac64kala@gmail.com