नोकरी तसेच व्यापार करण्याकरता विद्यार्थ्यांनी कौशल्य प्राप्त करणे अत्यावश्यक असते. हे लक्षात घेत केंद्र सरकारने कौशल्यांवर आधारित काही विशिष्ट प्रशिक्षणक्रम सुरू केले आहेत. नव्याने सुरू झालेले हे अभ्यासक्रम तुम्ही राहत असलेल्या शहरापासून दूर अशा शहरात उपलब्ध असले तरीही ते अल्पावधीचे असल्याने तुम्हाला काही दिवसांत पूर्ण करता येतील, या हेतूने या नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची ओळख करून देत आहोत-

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चेन्नई येथील सेंट्रल इन्स्टिटय़ूूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेत नोकरी मिळण्यासाठी तसेच स्वयंरोजगारासाठी सक्षम बनवणारे वेगवेगळ्या मुदतीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यातील अल्प कालावधीच्या काही अभ्यासक्रमांची माहिती देत आहोत-
१. इंटिग्रेटेड इंजिनीअिरग सॉफ्टवेअर प्रोग्रॅम ऑन ऑटोमोबाइल अ‍ॅण्ड एरोस्पेस प्रॉडक्ट डेव्हलपमेंट – हा सहा महिने कालावधीचा अभ्यासक्रम आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन दिले जाते.
२. मास्टर्स प्रोग्रॅम इन प्रॉडक्ट डेव्हलपमेंट – या अभ्यासक्रमाचा कालावधी पाच महिने आहे.
या दोन्ही अभ्यासक्रमांना प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना दरमहा पाच हजार रुपये विद्यावेतन दिले जाते. प्रॉडक्ट डिझाइनमध्ये गती व स्वारस्य असणाऱ्या उमेदवारांना आपले ज्ञान वृद्धिंगत करण्याची अधिक संधी या अभ्यासक्रमामुळे मिळू शकते. संबंधित उद्योगासाठी आवश्यक असणारे तंत्र आणि कौशल्यही या अभ्यासक्रमाद्वारे उमेदवारांना प्राप्त करता येते. या अभ्यासक्रमांना मुलाखतीद्वारे प्रवेश दिला जातो.

अर्हता- मेकॅनिकल विषयातील पदवी किंवा पदविका.
पत्ता- सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ प्लॅस्टिक इंजिनीअिरग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी, उपसंचालक, सीआयपीईटी, िगडी, चेन्नई- ६०००३२.
वेबसाइट- cipet.gov.in
ई-मेल- chennai@cipet.gov.in.

मराठीतील सर्व Learn इट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Automotive and aerospace product development study courses