शिल्लक राहिलेले अन्न खाताना नेहमी अन्न गरम केले जाते. बऱ्याचदा या कामासाठी मायक्रोओव्ह ओव्हन खूप उपयोगी ठरतो, विशेषत: जेव्हा तुम्ही घाईत असता तेव्हा. सकाळी ऑफिसच्या गडबडीत नाश्ता असो की, दुपारचे जेवण असो किंवा रात्रीचे जेवण असो, तुम्ही पटकन मायक्रोओव्ह ओव्हनमध्ये पुन्हा गरम करता येऊ शकता. मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये तुम्ही विविध पदार्थ पुन्हा गरम करू शकता, परंतु तुम्ही सर्वच पदार्थ पुन्हा गरम करू नये. कारण सर्व अन्न मायक्रोवेव्हमध्ये पुन्हा गरम केल्यानंतर चांगला प्रतिसाद देत नाही. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये काही पदार्थ पुन्हा गरम केल्यावर ते एकतर दूषित होतात किंवा कोरडे होतात आणि बेचव होतात. तज्ज्ञांच्या मते, साठवलेल्या अन्नातील बॅक्टेरिया प्रथिनांचे आणखी विघटन करतात आणि अन्नाचे पौष्टिक मूल्य काढून टाकतात. यामुळे अन्न विषबाधा सारख्या समस्या देखील होऊ शकतात. आम्ही लोकप्रिय खाद्यपदार्थांची यादी तयार केली आहे जी तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कधीही गरम करू नये.
येथे 5 खाद्यपदार्थ आहेत जे तुम्ही मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये पुन्हा गरम करू नयेत:
- भात:
असे म्हणतात की भातामध्ये बॅसिलस सेरियस(Bacillus cereus)चे बीजाणू असतात जो एक जीवाणू आहे ज्यामुळे अनेकदा अन्न विषबाधा होते. भात शिजल्यावर हे बीजाणू टिकून राहतात आणि भात खोलीच्या तपमानामध्ये जास्त काळ ठेवल्यास त्यांची वाढ होऊ शकते. त्यामुळे, उरलेला भात लवकर थंड करून फ्रिजमध्ये ठेवावा आणि पुन्हा खाण्यापूर्वी गॅसवर व्यवस्थित गरम करावा. मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये भात पुन्हा गरम केल्याने बॅसिलस सेरियसची वाढ थांबत नाही, ज्यामुळे आरोग्यास त्रास होतो.
हेही वाचा – प्रवास करताना निरोगी आणि तंदुरुस्त कसे राहावे? सेलिब्रिटी न्युट्रिशनिस्ट ऋजूता दिवेकरने सांगितले ३ सिक्रेट - उकडलेले अंडी:
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये उकडलेली अंडी पुन्हा गरम केल्याने ते फुटू शकतात, ज्यामुळे आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या कार्सिनोजेनिक विषारी पदार्थ बाहेर पडतात. याशिवाय, ही प्रक्रिया धोकादायक देखील असू शकते. जर तुम्हाला मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये अंडी पुन्हा गरम करायची असेल, तर ते फुटू नये म्हणून तुम्ही अंड्यातील पांढऱ्या आणि पिवळ बलकमधून छिद्र करावे.
- कॉफी:
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये कॉफी पुन्हा गरम करणे ही आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात सामान्य गोष्ट आहे. पण ते आता थांबवले पाहिजे. कारण कॉफी थंड झाल्यावर आम्लीय होते; ते पुन्हा गरम केल्याने उरलेला सुगंध खराब होऊ शकतो आणि तो मंद आणि बेचव होऊ शकतो. त्याऐवजी, तुमची कॉफी थर्मो-फ्लस्कमध्ये ठेवा आणि जेव्हा तुम्हाला ती हवी तेव्हा त्याचा आनंद घ्या.
हेही वाचा – आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण - चिकन:
मायक्रोवेव्ह ओव्हन अन्न पुन्हा गरम करताना समान रीतीने गरम होत नाही म्हणजे अन्नाचे काही भाग इतरांपेक्षा जलद शिजतात. चिकनच्या बाबतीत हे टाळण्यासाठी ते आतून शिजवणे महत्वाचे आहे कारण मायक्रोवेव्ह ओव्हन चिकन अन्न पुन्हा गरम होताना त्यातील प्रथिने कमी होऊ शकतात तर काही वेळा पोट खराब होऊ शकते आणि अन्न विषबाधा होऊ शकते. - मासे:
मायक्रोवेव्ह ओव्हन ओलावा शोषून घेतो, म्हणजे त्यात मासे पुन्हा गरम केल्याने त्याचा सर्व मऊपणा निघून जातो, ज्यामुळे ते कोरडे आणि चिवट होतात. याशिवाय, सीफूड मायक्रोवेव्हमध्ये गरम करताना फॅटी ऑईल खराब होऊ शकते, ज्यामुळे माशांचा वशाळ वास येऊ शकतो.
मग काय करावे? गॅस स्टोव्ह किंवा इंडक्शन कुकटॉपवर वर नमूद केलेले अन्न चांगले गरम करा आणि कोणत्याही भीतीशिवाय त्यांचा आनंद घ्या.
आपल्या जेवणाचा आनंद घ्या!
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)