Which Roti Is Good For Winter Season : भारतीय आहाराचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे पोळी. सकाळी चहाबरोबर तर दुपारी रात्री जेवताना आपण नियमितपणे त्यांचे सेवन करतो. कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असलेली पोळी तुमची भूक भागवते आणि शरीराला लगेचच ऊर्जा देते. देशाच्या बहुतेक भागात फक्त गव्हाच्या पिठाचीच पोळी खातात. पण, गव्हाच्या पिठामध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण खूप जास्त असते. हेच कारण आहे की, दिवसातून तीनपेक्षा जास्त गव्हाची पोळी खाल्ल्याने पचन कमकुवत होते, पोटफुगीची समस्या वाढते. त्यामुळे गव्हाच्या पिठाव्यतिरिक्त, इतर अनेक धान्ये आहेत; जी केवळ पचनासाठी चांगले नसून वजन आणि मधुमेहासाठी देखील आवश्यक आहेत.

एम्सचे माजी सल्लागार, साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर विमल झांझर म्हणतात, जर तुम्हाला हिवाळ्यात तुमचे शरीर उत्साही ठेवायचे असेल आणि अशक्तपणा, थकवा दूर करायचा असेल, पचन सुधारायचे असेल, वजन कमी करायचे असेल आणि मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर तुम्ही बाजरीच्या पिठाचे सेवन आहारात करावे. बाजरीचे पीठ तुमच्या अनेक आजारांवर नियंत्रण मिळवू शकते.

हिवाळ्यात गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची पोळी खाणे तुमच्या आरोग्यासाठी वरदान ठरू शकते. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र आणि हरियाणा सारख्या राज्यांमध्ये एकेकाळी बाजरीची भाकरी नियमित खाल्ली जात होती. पण, आता शहरी भागातही त्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाजरी गव्हाच्या पिठापेक्षाआरोग्यदायी आणि अधिक प्रभावी आहे.

तर हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?

तज्ज्ञांच्या मते, बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते; ज्यामुळे पचन सुधारते. या ब्रेडचे सेवन केल्याने पोट जास्त काळ भरलेले राहते. बाजरीच्या भाकरीचे सेवन केल्याने रक्तातील साखरेवर सहज नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे मधुमेह आणि वजन वाढलेल्या लोकांसाठी भरपूर फायदा होईल.

पोषणतज्ज्ञ म्हणतात की, बाजरी ही प्रथिनेयुक्त आहे; ज्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी६ आणि फॉलिक अॅसिड असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि हिवाळ्यात अतिरिक्त शक्ती प्रदान करते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, या बाजरीमधील अँटीऑक्सिडंट्स शरीराला विषारी पदार्थांपासून वाचवतात आणि निरोगी आहार शरीराला पुरवतात. या बाजरीमध्ये कर्करोगविरोधी अनेक गुणधर्म देखील असतात.

बाजरीच्या भाकरीचे आरोग्यदायी फायदे

  • आधुनिक जीवनशैलीत सामान्य असलेल्या गॅस, बद्धकोष्ठता, पोटफुगी, शुगर लेव्हल आणि थकवा यासारख्या समस्यांसाठी बाजरीची भाकरी खाणे फायदेशीर ठरते.
  • तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हे धान्य ग्लूटेन-मुक्त असते आणि वजन नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करते.
  • आहारतज्ज्ञ आठवड्यातून किमान एक किंवा दोनदा तुमच्या दैनंदिन आहारात बाजरीच्या भारीच समावेश करण्याची शिफारस करतात.
  • तुम्ही बाजरीचे पीठ गव्हाच्या पिठात मिसळून देखील खाऊ शकता.
  • भाजरीमधील लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि शरीराचे स्नायू, हाडे आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. हिवाळ्यात पारंपारिक गव्हाच्या पोळीऐवजी बाजरीची भाकरी खाल्ल्याने केवळ ऊर्जाच मिळणार नाही तर आजारांपासून बचाव होण्यास देखील मदत होईल.