Belly fat cause cancer in women: महिलांच्या आरोग्याचा विचार केला तर, पोटातील चरबी ही बऱ्याच काळापासून अनेक आजारांसाठी एक धोकादायक कारण ठरत आहे. मात्र, एका नवीन संशोधनातून असे दिसून आले की, या चबरीचे परिणाम आधीपेक्षाही अधिक धोकादायक असू शकतात. युरोपियन असोसिएशन ऑफ न्यूक्लियर मेडिसिनच्या ३८व्या वार्षिक अहवालात सादर केलेल्या अभ्यासात असे आढळले की, अवयवांभोवती साचलेली चरबी, व्हिसेरल फॅट, महिलांमध्ये आक्रमक एंडोमेट्रियल कॅन्सरला चालना देऊ शकते.

हॉकलँड युनिव्हर्सिटी हॉस्पिटल आणि बर्गन युनिव्हर्सिटीच्या संशोधकांना असे आढळले की, केवळ पोटातील चरबीचे प्रमाण महत्त्वाचे नाही, तर ती किती सक्रिय आहे हे महत्त्वाचे आहे. अभ्यासातून असे दिसून आले की, ऊर्जेसाठी जास्त ग्लुकोज जाळल्याने व्हिसेरल फॅट प्रत्यक्षात कर्करोगाच्या पेशींना इंधन पुरवू शकते. त्यामुळे त्यांची वाढ आणि प्रसार वेगाने होऊ शकतो.

हे शोधण्यासाठी संशोधकांच्या टीमने एंडोमेट्रियल कर्करोगाचे निदान झालेल्या २७४ महिलांच्या पीईटी तसंच सीटी स्कॅनचे निरीक्षण केले. त्यांनी व्हिसेरल फॅटने किती ग्लुकोज घेतले आहे हे मोजले, ते चयापचय क्रिया आणि जळजळीचे लक्षण आहे.

याचे निष्कर्ष काय?

ज्या महिलांच्या व्हिसेरल फॅटमध्ये ग्लुकोजची क्रिया जास्त होती, त्यांचा कर्करोग प्रगत टप्प्यावर होता. या महिलांना लिम्फ नोड मेटास्टेसेस होण्याची शक्यता जास्त होती. कारण यामुळे कर्करोग आधीच पसरण्यास सुरूवात झाली असल्याचे दिसून येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोटातील चरबीचे प्रमाण कर्करोगाच्या धोक्याशी थेट संबंधित नव्हते. त्याऐवजी चरबी हा त्यातला महत्त्वाचा घटक होता.

या शोधामुळे महिलांमध्ये कर्करोगाच्या धोक्याचे मूल्यांकन डॉक्टर कसे करू शकतात ते बदलते. केवळ शरीराचे वजन किंवा चरबीच्या प्रमाणावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी चरबीचे चयापचय आरोग्य राखण्यासह, व्हिसेरल फॅट कमी करणाऱ्या जीवनशैलीच्या सवयींची तातडीची गरज असल्याचे अधोरेखित करते.

एंडोमेट्रियल कर्करोगाची लक्षणे

एंडोमेट्रियल कर्करोग हा गर्भाशयात पेशींच्या वाढीपासून सुरू होतो. गर्भाशय हा पोकळ, नाशपतीच्या आकाराचा पेल्विक अवयव आहे जिथे गर्भाचा विकास होतो. गर्भाशयाच्या पेशींच्या थरात एंडोमेट्रियम थरात हा कर्करोग सुरू होते. काहीवेळा याला गर्भाशयाचा कॅन्सरही म्हटलं जातं. एंडोमेट्रियल कॅन्सर हा बहुतेकदा सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये आढळतो, कारण त्याची लक्षणे दिसून येतात. या कॅन्सरचे लवकर निदान झाल्यास शस्त्रक्रिया करून गर्भाशय काढून टाकल्याने तो बरा होतो.

लक्षणे

  • रजोनिवृत्तीनंतर योनीतून रक्तस्त्राव
  • मासिक पाळीदरम्यान अनियमित रक्तस्त्राव
  • ओटीपोटीत तीव्र वेदना

एंडोमेट्रियल बायोप्सीद्वारे याचे निदान केले जाऊ शकते. तसंच हिस्टेरोस्कोपी आणि अल्ट्रासाउंडच्या मदतीनेही निदान होऊ शकते.

यावर योग्य वजन, नियमित व्यायाम करणे, मधुमेह आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणे, हार्मोन्स संतुलित राखणे यासारखे उपाय केल्यास या कॅन्सरचा धोका कमी होऊ शकतो.