मुली फारच लाजाळू असतात. आपल्या मनातील भावना त्या सहजासहजी व्यक्त करत नाहीत. मुलं देखील मुलींच्या मनातील गोष्टी लगेचच ओळखू शकत नाहीत. मुलींसोबत चांगली मैत्री करायची असेल तर त्यांच्या मनातील गोष्टी जाणून घेऊन त्यानुसार वागणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. मुलींच्या मनातील गोष्टी जाणून घेणे इतके सोपे नसते. कारण बहुतेक वेळा त्या आपल्या मनातील गोष्टी नीट व्यक्त करू शकत नाहीत. मुलींच्या मनात आपले स्थान निर्माण करण्यासाठी, मुलींना नेमकी कशी मुले आवडतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरते. जाणून घेऊया मुलांमधील असे कोणते पाच गुण आहेत ज्याकडे मुली आकर्षित होतात.
आनंदी आणि दिलखुष मुले :
अनेकदा चित्रपटांमध्ये ‘हसी तो फंसी’ असे म्हटले जाते, कारण मुलींना अशी मुलं आवडतात जी स्वतः आनंदी असतात आणि जोडीदाराच्या चेहऱ्यावरही हास्य आणू शकतात. मुली अस्वस्थ आणि निराश मुलांपासून दूर राहणे पसंत करतात.
नॉन-जजमेंटल मुले :
तुलना आणि उपदेश करणारी मुलं मुलींना अजिबात आवडत नाही. म्हणजेच आपले दिसणे, कपडे, स्वभाव इत्यादींबद्दल मुलांनी आपल्याला जज करू नये असे मुलींना वाटत असते. तुम्हाला ही सवय असेल तर लगेचच आपली सवय बदला.
ऑनलाइन डेटिंग अॅप्सवर अशाप्रकारे होऊ शकते तुमची फसवणूक; वेळीच व्हा सावध
मुलींचा आदर करणारी मुले :
मुलींना आदराने बोलणारी मुले आवडतात. सकारात्मक स्वभाव मुलींना आवडतो. मुलांनी कधीही कोणत्याही मुलीचा, महिलेचा अनादर करू नये. असे केल्यास तुमची चुकीची छाप पडू शकते.
आत्मविश्वासू मुले :
एका रिसर्चनुसार, मुलींना ती मुलं आवडतात जी नजरेला नजर देऊन बोलतात. यावरून त्यांचा आत्मविश्वास दिसून येतो आणि हीच गोष्ट मुलींना आवडते. जी मुलं लाजाळू असतात किंवा बोलता बोलता नजर चोरतात ते मुलींच्या हृदयात जागा बनवू शकत नाहीत.
सरप्राइज देणारी मुले :
मुली हे उघडपणे सांगत नसल्या तरी त्यांना सरप्राइज खूप आवडतात यात शंका नाही. जर तुम्हाला तुमचं नातं सुधारायचं असेल तर मुलींना वेळोवेळी अशा गोष्टी न सांगता गिफ्ट करा ज्या त्यांना खूप आवडतात.
(येथे दिलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)