Kitchen Tips: भारतीय पदार्थांमध्ये कोथिंबीर, आले व हिरवी मिरची आवर्जून वापरली जाते. हे तिन्ही हिरव्या मसाल्यातील पदार्थ केवळ अन्नाचा स्वादच वाढवत नाहीत, तर ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. परंतु ते लवकर खराब होतात. कोथिंबीरची पाने सुकतात, मिरच्या खराब होतात आणि आले व्यवस्थित साठवले गेले नाही, तर त्याला बुरशी लागू शकते. जर तुम्हालाही अशा प्रकारच्या समस्या सातत्याने सतावत असतील, तर काही उपाय करून तुम्ही त्यांना अनेक दिवस सहजपणे त्यांचे ताजेपण टिकवून ठेवू शकता.

कोथिंबीर, मिरच्या आणि आले अनेक दिवस ताजे ठेवण्यासाठी उपाय

  • कोथिंबीर साठवण्यापूर्वी ती स्वच्छ पाण्याने धुवा आणि पूर्णपणे सुकवून घ्या. नंतर ती टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून हवाबंद डब्यात बंद करा. खरे तर कोथिंबीरीतील ओलावा टिश्यू पेपर शोषून घेईल. नंतर कोथिंबीरचा डबा रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.
  • हिरव्या मिरच्या जास्त काळ ताज्या ठेवण्यासाठी प्रथम त्याचे देठ काढून टाका. नंतर मिरच्या कोणत्या तरी सुक्या डब्यात भरून, तो रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. तुम्ही त्या कागदी पिशव्यांमध्येदेखील ठेवू शकता.
  • आले ताजे ठेवण्यासाठी त्याचे लहान लहान तुकडे करा आणि रेफ्रिजरेटरमध्ये हवाबंद डब्यात ठेवा. तुम्ही से सोलून झिपलॉक बॅगमध्येदेखील ठेवू शकता. त्यानंतर ती बॅग रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.