Cow’s Milk Or Buffalo’s Milk: भारतात दूध हे संपूर्ण अन्न मानले जाते. शारीरिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी लहान मुलांना दूध पिण्याची सवय लावली जाते. दुधामध्ये प्रोटीन्स, व्हिटॅमिन डी, कॅल्शियम असे विविध पोषक घटक असतात. शरीराच्या वृद्धीसाठी दुधाची खूप मदत होते. काही जण गाईपासून मिळलेल्या दुधाचे सेवन करतात, तर काहींना म्हशीच्या दुधाची सवय असते; तर काही लोक दोन्ही प्रकारांतील दुधाचा वापर करत असतात. पोषण, बौद्धिक विकास आणि शांत झोपेसाठी झोपण्यापूर्वी बरेच जण कोमट दूध पिण्यास प्राधान्य देतात. पण, आयुर्वेदानुसार कोणते चांगले आहे – गाईचे दूध की म्हशीचे दूध? हे आपण जाणून घेऊ.
गाईच्या दुधाचे फायदे
आयुर्वेद सांगतो की गाईचे दूध हलके, गोड आणि पचण्यास सोपे आहे. त्याचा थंडावा शरीर आणि मन दोन्हीला आराम देण्यास मदत करतो, ज्यामुळे गाढ झोप येते. रात्री गाईचे दूध प्यायल्याने वात दोषदेखील शांत होतो, ज्यामुळे अस्वस्थता, चिंता आणि निद्रानाश कमी होतो.
म्हशीच्या दुधाचे फायदे
म्हशीचे दूध जाड आणि चरबीने समृद्ध असते, ज्यामुळे ते पचण्यास जड असते. ते शक्ती आणि सहनशक्ती प्रदान करते, जे शारीरिकदृष्ट्या कठीण काम करतात किंवा ज्यांना त्यांची ऊर्जा पातळी वाढवण्याची आवश्यकता असते.
म्हशीच्या दुधामध्ये गाईच्या दुधापेक्षा ११ टक्के जास्त प्रोटीन्स असतात. म्हशीच्या दुधात lipids नावाचं प्रोटीन असतं. या प्रोटीनमुळे नवजात मुलांना हे दूध पचायला त्रास होतो. म्हशीच्या दुधाच्या तुलनेमध्ये गाईच्या दुधामध्ये कमी फॅट्स असतात. यामुळे गाईचं दूध पातळ असतं. त्यातील फॅट्सचं प्रमाण हे ७-८ टक्के असतं. याउलट म्हशीच्या दुधात ३-४ टक्के फॅट्स असतात. सोप्या शब्दात गाईचं दूध पचायला फारसा त्रास होत नाही.