Vegetable options for week: घरातील महिलांना रोजचा सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आज काय बनवायचं? स्वयंपाकघरात जाण्यापूर्वी प्रत्येक महिलेला हा विचार सतावतो. अनेकदा तर स्वयंपाकापेक्षा काय बनवायचं हे ठरवण्यातच वेळ जातो. पण, आता या प्रश्नाचं सोपं उत्तर तुमच्यासमोर आहे. सोमवारपासून रविवारपर्यंत रोज वेगवेगळ्या भाज्यांचा मेनू तयार करून ठेवला तर तुमचं काम खूपच सोपं होईल.
सोमवार : टोमॅटो-बटाटा भाजी
आठवड्याची सुरुवात नेहमी हलक्या आणि सर्वांना आवडणाऱ्या पदार्थाने करावी. त्यामुळे पहिल्या दिवशी टोमॅटो-बटाटा भाजी उत्तम ठरेल. ही भाजी बनवायला सोपी आणि चवदार असते. पोळी, भाकरी किंवा भात – कोणत्याही पदार्थासोबत सहज खाल्ली जाते.
मंगळवार – दुधी भोपळा
दुसऱ्या दिवशी आरोग्यदायी भाजी निवडावी. दुधी भोपळ्यात भरपूर फायबर असतं, ज्यामुळे पचन चांगलं होतं. दुधीची साधी भाजी, कोफ्ते किंवा दुधी-चणा डाळ – कोणत्याही प्रकारे हा पदार्थ स्वादिष्ट लागतो.
बुधवार – वांगी
आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी वांग्याची भाजी उत्तम पर्याय ठरते. वांग्याचं भरीत, साधी भाजी किंवा भरलेली वांगी या कोणत्याही प्रकारे वांग्याची भाजी बनवली तरी उत्तमच लागते. भात,पोळी, पराठा यासोबत वांग्याची डिश अगदी चवदार लागते.
गुरुवार – भोपळ्याची भाजी
आठवड्याच्या चौथ्या दिवशी तुम्ही भोपळ्याची भाजी करू शकता. ही भाजी मुलांना फारशी आवडत नाही, पण शरीरासाठी ती पौष्टिक आहे. साध्या मसाल्यात बनवलेली भोपळ्याची भाजी आणि गरमागरम फुलके हे कॉम्बिनेशन नक्कीच घरच्यांना पसंत पडेल.
शुक्रवार – भेंडी
आठवड्याच्या पाचव्या दिवशी भेंडीची भाजी बनवू शकता. तुम्ही भरलेली भेंडी किंवा मसालेदार भेंडी अशा दोन प्रकारे भाजी बनवू शकता. ती रोटी, भात आणि अगदी पुरीसोबतही उत्तम लागते. सोबत साधी डाळ केली तर जेवण अधिक चवदार होतं.
शनिवार – पनीर
सुट्टीच्या आधीच्या दिवशी काहीतरी चविष्ट हवं असतं, यासाठी तुम्ही पनीर हा पर्याय निवडू शकता. पनीरचा वापर करून तुम्ही अनेक पदार्थ बनवू शकता. पनीर मसाला, किंवा मटार पनीर कोणतीही प्रकारची भाजी ही तंदुरी रोटी, नानसोबत अप्रतिम लागते.
रविवार – मिक्स व्हेज
आठवड्याचा शेवट रंगीत आणि स्वादिष्ट असावा, त्यामुळे रविवारच्या मेनूमध्ये मिक्स व्हेज हा उत्तम पर्याय आहे. चिरलेल्या सगळ्या भाज्या मसाल्यात मिक्स करून केलेली भाजी चविष्ट तर लागतेच, शिवाय पौष्टिकही असते. त्याचबरोबर मुलंदेखील खूश होतील.
अशा प्रकारे आठवडाभरासाठी भाज्यांची यादी आधीच तयार ठेवली तर ‘आज काय बनवायचं?’ या प्रश्नाची चिंता उरत नाही. त्यामुळे महिलांचा वेळ वाचतो आणि जेवणात दररोज नवी चव येते.