Advantages and disadvantages of chewing Gum: अनेकांना सतत च्युइंगम चघळण्याची सवय असते. त्याशिवाय आता बाजारात अनेक फ्लेवर्सचे च्युइंगम मिळू लागले आहेत. अनेकांच्या मते, त्यामुळे चेहऱ्याचा व्यायाम होतो; तर काही जण च्युइंगम चघळण्याला वाईट सवय समजतात. त्या पार्श्वभूमीवर आज आपण च्युइंगम चघळण्याचे फायदे-तोटे जाणून घेऊ

च्युइंगम चघळण्याचे फायदे

‘डबल चिन’ कमी होते

च्युइंगममुळे चेहऱ्याच्या खालचा भागाचा व्यायाम होतो आणि त्यामुळे चरबी कमी होते. ‘डबल चिन’ कमी करण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. कारण- च्युइंगम चघळल्याने कॅलरीज बर्न होतात.

कमी भूक लागणे

च्युइंगम चघळल्याने भूक कमी होते. त्यामुळे वजन कमी करू इच्छिणान्यांसाठी हा योग्य पर्याय आहे. त्यासोबत जर तुम्हाला मळमळल्यासारखे होत असेल, तर च्युइंगममुळे तुम्हाला आराम मिळतो.

तोंडात जीवाणू वाढत नाहीत

च्युइंगम चघळल्याने तोंडात लाळ निर्माण होते, ज्यामुळे तोंडात जीवाणू वाढू शकत नाहीत. अभ्यास करताना जर तुम्हाला झोप येत असेल, तर तुम्ही हे करून पाहू शकता.

च्युइंगम चघळण्याचे दुष्परिणाम

दातांचा मुलामा कमकुवत होतो

सतत च्युइंगम चघळण्याने तुमच्या दातांचा मुलामा कमकुवत होऊ शकतो. त्याशिवाय जर तुम्ही च्युइंगम व्यवस्थित खाल्ले नाही किंवा ते जास्त वेळ तोंडात ठेवले, तर जीवाणूंची वाढ होऊ शकते.

पोटाच्या आतड्यांसंबंधी समस्या

च्युइंगम चघळल्याने तुमच्या पोटात वेदना किंवा गॅस होऊ शकतो. त्याशिवाय दातदुखीची समस्यादेखील उद्भवू शकते.