benefits of eating bananas daily: केळी हे आपल्या दैनंदिन आहारातील एक फळ आहे. व्यायामापूर्वी खाल्ल्यास याला ‘ऊर्जा देणारे फळ’ म्हणून ओळखले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का की, हे साधे दिसणारे फळ आपल्याला काही घातक आजारांपासूनही वाचवू शकते? नाही… तर डॉक्टर तरंग कृष्णा यांच्या मते, दररोज फक्त दोन केळी खाल्ल्याने पोटाच्या अल्सरपासून ते पोटाच्या कर्करोगापर्यंत अनेक सहज आजार टाळता येतात. कसं ते जाणून घेऊयात…
पोटासाठी नैसर्गिक ढाल केळी
डॉक्टर कृष्णा यांच्या मते, केळ्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात, जे पोटाच्या संरक्षणात्मक आवरणाला मजबूत करतात. हे आवरण पोटातील आम्ल आणि हानिकारक जीवाणूंविरुद्धची भिंत म्हणून काम करते. Helicobacter pylori (H. pylori) नावाचा जीवाणू पोटात अल्सर निर्माण करतो आणि दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढवतो. नियमितपणे केळी खाल्ल्याने या जीवाणूंची क्रिया कमी होते आणि त्यामुळे पोटावर एक नैसर्गिक संरक्षणात्मक थर तयार होतो.
फ्लेवोनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स
केळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लेवोनॉइड्स आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरात ‘रक्षण करणारे सैनिक’ म्हणून काम करतात. यामुळे शरीरातील जळजळ कमी होते, मुक्त रॅडिकल्सपासून (हानिकारक कणांवर) ऊतींचे (पेशींचे) होणारे नुकसान टाळतात. परिणामी, आतड्यांचं आरोग्य टिकून राहते आणि दीर्घकालीन आजारांपासून संरक्षण मिळते.
पोटात तयार होते नैसर्गिक कवच
डॉक्टर कृष्णा यांच्या मते, केळी पोटात श्लेष्माचे उत्पादन वाढवते. हा श्लेष्मा एक मऊ, नैसर्गिक उशीसारखा थर आहे; जो पोटाच्या संरक्षण करणाऱ्या जागेला आम्लापासून वाचवतो. त्यामुळे अल्सर होण्याची शक्यता कमी होते आणि आधीच झालेल्या अल्सरवरही उपचारासारखा परिणाम होतो.
केळ्याचे इतर फायदे
केळी केवळ पोटाचे रक्षणच करीत नाही, तर पचनसंस्थेला देखील मजबूत ठेवते. त्यातील प्री-बायोटिक फायबर आतड्यांमध्ये चांगल्या जीवाणूंच्या वाढीस प्रोत्साहन देतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते. केळ्यातील नैसर्गिक साखर शरीराला सातत्याने ऊर्जा पुरवते; पण रक्तातील साखरेत अचानक वाढ वा घट होऊ देत नाही.
साधं, पण परिणामकारक फळ
केळी हे स्वस्त, सहज उपलब्ध असलेलं आणि सर्व वयोगटांतील लोकांसाठी योग्य असे फळ आहे. यामुळे केळी तुम्ही स्मूदी, दूध किंवा नुसतं खाल्लं तरी ते शरीरासाठी लाभदायक ठरतं. रोज दोन केळी खाण्याची ही सोपी सवय शरीराचं नैसर्गिक संरक्षण बळकट करते आणि सिद्ध करते की, कधी कधी सर्वांत साध्या गोष्टीतच सर्वांत मोठं आरोग्याचं रहस्य दडलेलं असतं.