How to dry clean or wash silk sarees at home: साड्या म्हणजे महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. रोजच्या धकाधकीच्या जीवनात रोज साड्या नेसणं जमत नसेल तरीही कोणत्याही खास प्रसंगी साड्या आवर्जून नेसल्या जातात. बनारसी किंवा सिल्क साड्या कायम ट्रेंडमध्ये असतात, तशाच त्या महागड्याही असतात. मात्र, त्यांची काळजीदेखील घ्यावी लागते. अशाप्रकारच्या बनारसी, सिल्क साड्या महागड्या असतात, त्यामुळे महिला शक्य तितक्या काळासाठी या साड्या नवीन दिसण्याचा प्रयत्न करतात.

अशा महागड्या साड्यांची किंमत कमी होऊ नये यासाठी अनेकदा महिला घरी साड्या न धुता त्या ड्रायक्लिन करण्यासाठी लाँड्रीमध्ये देतात. बरं, ड्रायक्लिन करण्यासाठी खर्चही खूप होतो. तेव्हा बनारसी किंला सिल्क साड्या घरच्या घरी ड्रायक्लिन कशा करायच्या ते आता जाणून घ्या… या तीन पद्धती वापरून तु्ही साडी खराब न होता घरच्या घरी ती अगदी स्वच्छ करू शकता.

डाग काढण्यासाठी उपाय

तुमच्या साडीवर जर डाग पडले असतील तर तुम्ही मीठाचा स्क्रब वापरू शकता. डाग पडलेल्या भागावर थोडे मीठ घाला आणि मऊ कापडाने घासून घ्या. यामुळे तो डाग काहीसा पुसट होण्यास मदत होईल. यासाठी ड्राय क्लिनिंग सॉल्व्हेंट्सदेखील उपलब्ध आहेत.

घरच्या घरी ड्रायक्लीन कसे करायचे?

घरी साडी ड्रायक्लीन करण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे डार्य क्लिनिंग किट खरेदी करणे. केमिकल सोल्युशन डागावर लावल्याने ते लगेच निघून जाईल आणि तुमची साडी स्वच्छ दिसेल.

घरी सिल्क किंवा बनारसी साडी कशी धुवावी?

घरीच सिल्क किंवा बनारसी साड्या धुण्यासाठी सर्वात आधी एका टबमध्ये पाणी घ्या. त्यात सौम्य लिक्विड डिटर्जंट किंवा बेबी शॅम्पू मिसळा. जर ते उपलब्ध नसेल, तर तुम्ही ई-गिंग देखील घालू शकता. साडी ५ मिनिटे पाण्यात भिजवा. पाण्याने हळूवारपणे धुवा. तिला अजिबात घासू नका, नाहीतर साडी खराब होऊ शकते.

महागड्या साड्या घरी धुताना या गोष्टी लक्षात ठेवा

सिल्क किंवा बनारसी साड्या घरीच ड्रायक्लीन करण्याआधी कापडाचे कोणतेही नुकसान हेऊ नये म्हणून पॅच टेस्ट नक्की करा. तुम्ही कोणतीही प्रक्रिया वापरत असलात, तरी प्रथम साडीच्या एका काठावर त्याची चाचणी करा. जर तुम्हाला कोणतेही दुष्परिणामदिसल तर ते संपूर्ण साडीसाठी वापरू ना. यामुळे साडी खराब होण्यापासून वाचेल.

ड्राय क्लिनिंग करताना तसंच सिल्क किंवा बनारसी साड्या धुताना काळजी घ्या. आकुंचन टाळण्यासाठी त्यांना जोरात दाबू किवा पिळू नका. तसंच त्या सुकवण्यासाठी उन्हात अजिबात ठेवू नका.