Curry Leaves : कढीपत्ता हा आपण सहसा स्वयंपाक करताना अनेक पदार्थांमध्ये टाकतो. कढीपत्ता फक्त अन्नाची चवच वाढवत नाही, तर त्याशिवायही त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. अनेकांच्या घरी कढीपत्त्याचं झाड असतं; तर काही लोक गरजेनुसार तो विकत घेतात. काही लोकांचा असा गैरसमज आहे की, कढीपत्ता जास्त दिवस टिकत नाही; पण कढीपत्ता तुम्ही अनेक महिने साठवून ठेवू शकता. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरं आहे. चला तर याविषयी सविस्तर जाणून घेऊ या ….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • जर तुम्हाला कढीपत्ता साठवून ठेवायचा असेल, तर भरपूर कढीपत्ता जमा करा. त्यानंतर हा संपूर्ण कढीपत्ता स्वच्छ पाण्यानं धुऊन, त्यातील खराब व चांगली पानं वेगवेगळी करा.
  • बाजूला केलेली कढीपत्त्याची चांगली पानं एक-दोन दिवस उन्हात ठेवा किंवा ती पानं पेपरमध्ये गुंडाळून पंख्यासमोर ठेवा.

हेही वाचा : Sleep Time : रात्री कधी आणि किती तास झोपावे? जाणून घ्या वयानुसार झोपण्याचे वेळापत्रक

  • कढीपत्त्याची ही पानं व्यवस्थित वाळल्यानंतर हवाबंद डबा किंवा बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. असं केल्यामुळे कढीपत्त्याला बुरशीपासून धोका नसतो. याबरोबर कढीपत्ता खूप ताजा असतो. तुम्ही हा कढीपत्ता ५-६ महिने वापरू शकता. जर तुमच्याकडे फ्रिज नसेल, तर तुम्ही थंड ठिकाणी हा कढीपत्ता ठेवू शकता.
  • जर तुम्हाला ५-६ महिने कढीपत्ता साठवून ठेवायचा नसेल; पण १०-१२ दिवस ताजा असावा, असे वाटत असेल, तर तुम्ही कढीपत्ता पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून तो फ्रिजमध्ये ठेवू शकता; पण तीनचार दिवसांनंतर पेपर टॉवेल बदलणं आवश्यक आहे.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How to store curry leaves or kadi patta for 5 6 months try these remedies at home ndj