How to Store Ginger: पावसाळ्याच्या दिवसांत भाज्या लवकर खराब होतात. त्यामुळे या भाज्या जास्तीत जास्त दिवस टवटवीत ठेवण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. या दिवसांत जर तुम्हाला आलं स्टोअर करून ठेवायचे असेल, तर काही सोप्या आणि घरगुती उपायांचे पालन करून तुम्ही नक्कीच ते करू शकता.

या उपायाने आले टिकेल महिनो महिने

हवाबंद डब्यात साठवा

पावसाळ्यात जास्त आर्द्रतेमुळे आले खूप लवकर खराब होते. अशा परिस्थितीत उघड्यावर ठेवण्याऐवजी तुम्ही ते हवाबंद डब्यात साठवू शकता. त्यासाठी प्रथम आले पूर्णपणे वाळवा व हवाबंद डब्यात बंद करा आणि फ्रिजमध्ये ठेवा. अशा प्रकारे आले बरेच दिवस टवटवीत राहील.

पेस्ट बनवा आणि साठवा

आले जास्त काळ साठवायचे असेल, तर तुम्ही त्याची पेस्ट बनवू शकता. त्यासाठी आले सोलून त्याचे लहान तुकडे करा आणि त्याची पेस्ट तयार करा. त्यानंतर ती फ्रिजरमध्ये ठेवा. अशा प्रकारे तुम्ही आले बरेच दिवस वापरू शकता.

मीठ लावून ठेवा

तुम्ही आले मिठात बुडवूनदेखील साठवू शकता. आले जास्त काळ ताजे ठेवण्याचा हा एक प्रभावी मार्ग आहे. त्यासाठी प्रथम आल्याचे तुकडे करा. त्यांना थोडे मीठ लावा आणि ते काचेच्या बाटलीत भरून ठेवा. मीठ आल्याला आर्द्रतेपासून वाचवते आणि त्यामुळे ते बराच काळ ताजे राहते.