Bad Breath Home Remedies: अनेकदा दररोज दात घासूनही काहींच्या तोंडातून दुर्गंध येतो. तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे त्या व्यक्तीला चारचौघांत लाजल्यासारखे होते. तोंडाच्या खराब आरोग्यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते. बाजारात अशी अनेक उत्पादने सहज उपलब्ध आहेत, जी काही काळासाठी तोंडाची दुर्गंधी थांबवतात; परंतु यामुळे अनेक दुष्परिणाम होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही घरच्या या सोप्या उपायांनी दुर्गंधी दूर करू शकता.
दररोज कडुलिंबाचा टूथपिक वापरा
प्राचीन काळी लोक दररोज लिंबाच्या टूथपिकने तोंड स्वच्छ करायचे. कडुलिंबाची टूथपिक शतकानुशतके वापरली जात आहे. खरे तर कडुलिंबामध्ये क्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तोंडात बॅक्टेरिया वाढण्यापासून रोखतात. सकाळी कडुलिंबाच्या टूथपिकने ब्रश केल्याने तोंडाची दुर्गंधी कमी होऊ शकते.
दररोज लवंगा चावा
लवंगाच्या मदतीने तुम्ही तोंडातून येणारी दुर्गंधी कमी करू शकता. यामध्ये अनेक अँटीसेप्टिक आणि अँटीमायक्रोबियल गुणधर्म असतात, जे वाईट बॅक्टेरिया कमी करण्यास मदत करतात. लवंग चावल्याने पचनदेखील सुधारते.
त्रिफळा पावडरने गुळण्या करा
त्रिफळा पावडरच्या पाण्याने गुळण्या करू शकता. खरे तर त्यात अनेक प्रकारचे घटक आढळतात, जे तोंडातील जंतू सहजपणे मारतात.
वेलची किंवा बडीशेप चघळा
जेवल्यानंतर वेलची किंवा बडीशेप चघळा, यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर करता येते. त्याचे सेवन केल्याने तोंडातून चांगला वास येण्यास मदत होते.
मोहरीचे तेल आणि मिठाने मालिश करा
तुम्ही मोहरीच्या तेलाने आणि मिठाने दातांची मालिशदेखील करू शकता. यासाठी मोहरीच्या तेलात निमूटभर मीठ मिसळून हिरड्या आणि दातांची मालिश करा. यामुळे तुमचे दात स्वच्छ होतातच, शिवाय दुर्गंधीची समस्याही दूर होते. तुम्ही आठवड्यातून दोनदा हे वापरू शकता.