How To Get Rid Of Mice: अनेकदा घराच्या खिडकीतून किंवा दरवाजातून एखादा उंदीर घरात शिरतो. अशाप्रकारे घरामध्ये एकाहून अधिक उंदरांचा सुळसुळाटही वाढत जातो. या उंदरांमुळे कधीकधी खूप मोठे नुकसान होते. घरातील वस्तूंची नासाडी करण्याबरोबरच ते घरामध्ये घाणही आणतात आणि रोगराई पसरवतात. उंदरांना दूर ठेवण्यासाठी लोक अनेक पद्धती वापरतात. काही जण त्यांना विष देऊन मारतात, तर काही जण सापळ्यांचा वापर करतात. अशा परिस्थितीत काही घरगुती उपायांचा अवलंब करून तुम्ही त्यांना सहजपणे हाकलून लावू शकता. यासाठी उंदरांना मारण्याची आवश्यकता नाही.

उंदीर पळवून लावण्यासाठी सोप्पे उपाय

तुरटी वापरा

उंदरांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही घराच्या कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरातील कॅबिनेटमध्ये आणि कपाटांमध्ये लहान तुरटीच्या गोळ्या ठेवू शकता. उंदरांना तुरटीचा वास आवडत नाही, ज्यामुळे ती त्यांना दूर पळवण्यासाठी खूप प्रभावी ठरते.

कांदा आणि लसूण फवारणी

कांदा आणि लसूण स्प्रेदेखील उंदरांना दूर ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतो. कांदा आणि लसणाचा रस स्प्रे बाटलीत भरा, नंतर थोडे पाणी घाला आणि पाणी मिसळण्यासाठी बाटली चांगली हलवा. आता घराच्या प्रत्येक कोपऱ्यात फवारणी करा, यामुळे उंदीर पळून जातील.

कडुलिंब आणि निलगिरी तेल

उंदरांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही निलगिरी तेल वापरू शकता. दोन्ही तेल एका स्प्रे बाटलीत भरून प्रवेशद्वारांवर स्प्रे करा, यामुळे ते तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाहीत.

पुदिना वापरा

उंदरांना दूर ठेवण्यासाठी तुम्ही पुदिन्याचा वापरदेखील करू शकता. उंदरांना त्याचा तिखट वास आवडत नाही. कापसाचे गोळे पुदिन्याच्या तेलात भिजवून घराच्या कोपऱ्यांमध्ये ठेवा.