Jugaad Video : सोशल मीडियावर जुगाडचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही जुगाड इतके भन्नाट असतात की पाहून आपण अवाक् होतो. सध्या असाच एक जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. घरातील झुरळ कसे पळवायचे, याविषयी एका महिलेने एक अनोखा जुगाड सांगितला आहे.
अनेकदा घरी झुरळ फिरतात मग अशावेळी झुरळ कसे गायब करावे, हे कळत नाही. अनेक उपाय करून सुद्धा फायदा होत नाही. पण या महिलेने एक अनोखा उपाय सांगितला आहे. कांद्यावर तुम्ही कधी टूथपेस्ट टाकली आहे का? तुम्हाला वाटेल कांद्यावर टूथरपेस्ट टाकल्याने काय होतं? या व्हिडीओमध्ये या महिलेने घरातील झुरळ गायब करण्यासाठी कांद्यावर टूथपेस्ट टाकण्यास सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –

“एक कांदा घ्या. फक्त अर्धा कांदा घ्या. त्यानंतर तो कांदा नीट किसून घ्यावा. त्यानंतर कांद्याचा व्यवस्थित असा रस निघतो. त्यानंतर त्यात बोरीक पावरडर टाकायचे. या पाडवरमुळे एक पेस्ट तयार होईल, एवढे बोरीक पावडर टाका. त्यानंतर या पेस्टचा ओलावा अधिक काळ टिकवून ठेवण्यासाठी त्यात टूथपेस्ट टाकायची आहे. अशाप्रकारे पेस्ट तयार करा. बऱ्याचदा आपल्या घरात भरपूर झुरळ होतात. झुरळांपासून आपण खूप त्रस्त असतो. अशावेळी ही बनवलेली पेस्ट जिथे जिथे झुरळ फिरतात त्या ठिकाणी ही पेस्ट लावायची आहे. आठवड्याभरातनंतर पुन्हा ही पेस्ट लावायची आहे. तुम्हाला नक्की फरक दिसून येईल.”

हेही वाचा : तुम्हालाही बर्फ चघळण्याची सवय आहे? मग ही सवय ठरू शकते आरोग्यासाठी धोकादायक, तज्ज्ञ सांगतात…

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : Perfect Sandwich Tip : सँडविच बनवताय? मग हा ‘थ्री फिंगर रूल’ नक्की ट्राय करून पाहा, आहारतज्ज्ञ म्हणतात की…

prajakta_salve_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कांद्यावरती कोलगेट टाकताच कमाल झाली” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “माणसे घरात बसायचे सुद्धा नाहीत कांद्याच्या वासाने..” तर एका युजरने लिहिलेय, “खरंच याचा फायदा होतो का?”

प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून घरगुती उपायांच्या अनेक व्हिडीओ शेअर करतात. त्यांना इन्स्टाग्रामवर हजारो लोक फॉलो करतात आणि त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jugaad video a woman told jugaad for how to get rid of cockroach at home she suggested to put toothpaste on onion video viral ndj