Kitchen Jugaad : अनेकदा भाजीत तेल जास्त होतं. अशावेळी काय करावं हे सुचत नाही. काही लोक जाणीवपूर्वक भाजीत तेल जास्त टाकतात. कारण त्यांना असे वाटते की, भाजीत तेल जास्त असेल तर भाजीची ग्रेवी चांगली तयार होते; पण याचे दुष्परिणाम आपल्या आरोग्यावर दिसून येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजीमध्ये तेल जास्त असल्यामुळे अनेकदा आरोग्याशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशात जेवण करताना कमीत कमी तेलाचा वापर करणे नेहमी चांगले आहे; पण एखाद्या वेळी चुकूनही भाजीत तेल जास्त झाले असेल तर टेन्शन घेऊ नका, काही ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही भाजीतील तेल वेगळं करू शकता.

हेही वाचा : उच्च रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांनी हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी दररोज दोन कप कॉफी प्यावी की ग्रीन टी? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात …

१. जर भाजीत तेल जास्त झाले असेल तर तेल वेगळं करण्यासाठी भाजीला फ्रीजमध्ये ठेवा. तेलात फॅट असते आणि फॅट थंड ठिकाणी लवकर जमा होते. जर तुम्ही भाजी फ्रीजमध्ये ठेवली, तर तुम्ही काही तासाने तेल वेगळं करू शकता.

२. भाजीत तेल जास्त झाले असेल तर तुम्ही मोठ्या आकारांचे बर्फाचे तुकडे वापरू शकता. यासाठी बर्फाच्या तुकड्यांना भाजीत टाका. सर्व फॅट म्हणजेच तेल या बर्फाच्या तुकड्यांना चिकटणार. थोड्या वेळाने तुम्ही हे बर्फाचे तुकडे बाहेर काढू शकता. या बर्फाच्या तुकड्यांबरोबर भाजीतील तेलही वेगळे होईल.

३. पेपर टॉवेलच्या मदतीनेही तुम्ही भाजीतील तेल कमी करू शकता. सुक्या भाजीमध्ये जर तेल जास्त झालं असेल तर हा बेस्ट पर्याय आहे. भाजीवर थोडा वेळ पेपर टॉवेल ठेवा. त्यातील तेल पेपर टॉवेल शोषून घेईल.

हेही वाचा : Weight Loss: दही की ताक? वजन कमी करण्यासाठी नेमकं काय खावे, वाचा तज्ज्ञ काय सांगतात

४. ब्रेडचा वापर करूनही तुम्ही भाजीतील तेल बाहेर काढू शकता. ब्रेडमध्ये पेपर टॉवेलसारखी तेल शोषून घेण्याची क्षमता असते. यामुळे भाजीत असलेले जास्तीचे तेल सहज वेगळे करता येऊ शकतात.
यासाठी सुरुवातीला भाजीच्या ग्रेवीमध्ये ब्रेडचे तुकडे टाका आणि जेव्हा हे तुकडे सर्व तेल शोषून घेईल तेव्हा हे ब्रेडचे तुकडे त्यातून बाहेर काढा.

५. जर भाजीत तेल जास्त झाले असेल तर त्यात उकळलेला बटाटा टाका. पाच मिनिटे भाजीमध्ये हा बटाटा शिजू द्या. या दरम्यान भाजीतील तेल बटाटा शोषून घेईल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugaad how to get rid of excess oil from bhaji or sabji try these trick to separate oil from gravy ndj