गॅस सिलेंडर हे अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. आज घरोघरी तुम्हाला गॅस सिलेंडर पाहायला मिळेल. दिवसेंदिवस घरगुती गॅस सिलेंडरचे दर वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरीक चिंतेत दिसतात पण टेन्शन घेऊ नका आज आम्ही तुम्हाला गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल, याबाबत टिप्स सांगणार आहोत.
सोशल मीडियावर तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असेल ज्यामध्ये गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल, किंवा सिलेंडरमधील गॅस कसा वाचवावा, या संदर्भात माहिती दिलेली असते. असाच एक व्हिडीओ युट्यूबवर सुद्धा व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये गॅस सिलेंडर जास्त दिवस कसा वापरता येईल, याबाबत पाच टिप्स सांगितल्या आहेत. चला तर जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • सिलेंडर घरी आणल्यानंतर सुरुवातीला या सिलेंडरचे वजन मोजून घ्यावे. वजन ठिक असेल तर चांगले आहे नाहीतर सिलेंडर बदलून घ्यावे. कारण सिलेंडर जास्त दिवस आपल्याला टिकवायचा असेल तर त्यासाठी तो नीट भरलेला असणे गरजेचा आहे. तसेच ज्या दिवशी आपण सिलेंडर घरी आणला ती तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवायची, यामुळे आपल्याला लक्षात येईल की सिलेंडर किती दिवस वापरण्यात आला. ही सवय जर कायम ठेवली तर सिलेंडर किती दिवस टिकेल याचा आपल्याला अंदाज राहील.
  • गॅस बर्नर नियमित स्वच्छ करायचा जेणेकरुन हा योग्य प्रमाणात वापरला जाईल. जर बर्नरमध्ये कचरा किंवा काही घाण साचलेली असेल तर निळ्या ऐवजी थोड्या पिवळ्या रंगाची दिसते.त्यावेळी बर्नर स्वच्छ धुवून घ्यायचा.गॅसचा बर्नर स्वच्छ ठेवण्यासाठी गरम पाण्यात गॅसचा बर्नर ठेवायचा आणि त्यात थोडा लिंबू पिळून घ्यायचा. त्यात इनोचे संपूर्ण पॅकेट टाकायचे. दोन तीन तासांसाठी या मिश्रणामध्ये बर्नर भिजून ठेवायचे आणि त्यानंतर ब्रशनी बर्नर नीच घासून स्वच्छ धुवायचे.

हेही वाचा :

  • स्वयंपाक करण्यापूर्वी सर्व पूर्वतयारी आधीच करुन ठेवायची. जसे की भाज्या कापणे, लसूण निवडणे, मसाले वर काढून ठेवायचे. यामुळे फोडणी देताना गॅस कमी जास्त करावा लागणार नाही.कारण गॅस कमी जास्त केल्यामुळे गॅस वाया जाण्याची शक्यता असते.
  • स्वयंपाकात शक्य असेल तिथे कुकरचा वापर करा. यामुळे स्वयंपाकाला कमी गॅस खर्च होईल आणि गॅसबरोबर वेळेची सुद्धा बचत होईल. तसेच डाळ आणि तांदूळ शिजवण्यापूर्वी किमान अर्धा तास तरी भिजत ठेवा. यामुळे सुद्धा डाळी किंवा तांदूळ लवकर शिजणार.
  • गॅस वापरताना योग्य भांडे वापरा. प्रमाणानुसार भांड्याचा आकार निवडा. जर शेगडीमध्ये किंवा गॅसच्या नळीमध्ये थोडी फार लिकेज होत असले तर लगेच दुरुस्ती करुन घ्या. यामुळे गॅस वाया जाणार नाही. तसेच रेग्युलेटर आणि गॅसची नळी वेळोवेळी बदलून घ्यावी. गॅसचा वापर केल्यानंतर रेग्युलेटर नीट बंद करा. यामुळे गॅस वाया जाणार नाही आणि गॅस जास्त दिवस वापरता येईल.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugaad how to save gas while cooking at home 5 ways to save lpg gas cylinder know lpg saving tips hacks ndj