Health Benefits of Chia Seeds: हल्ली बहुतांश लोक लठ्ठपणाच्या समस्येने त्रस्त आहेत. लठ्ठपणा हे अनेकांसाठी मोठे आव्हान बनले आहे. लठ्ठपणामुळे अनेक प्रकारचे आजार होण्याचा धोका असतो, ज्यावर उपाय म्हणून लोक विविध प्रयोग करताना दिसतात; पण त्यांचा त्यांना काहीच उपयोग होत नाही. जर तुम्हालाही लठ्ठपणाचा त्रास होत असेल आणि सर्व प्रयत्न करूनही तुमचे वजन कमी होत नसेल, तर तुम्ही चिया सीड्स वापरू शकता. खरं तर, चिया सीड्समध्ये फायबर आणि ओमेगा-३ फॅटी अॅसिड आढळतात, जे खाल्ल्याने पोट भरलेले राहते. त्यात प्रथिने आणि अँटी ऑक्सिडंट्सदेखील असतात, जे चयापचय प्रक्रियेला गती देतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिया सीड्स कसे खावे?

पाण्यात भिजवून प्या

तुम्ही चिया सीड्स पाण्यात भिजवून खाऊ शकता. त्यासाठी चिया सीड्स रात्री पाण्यात भिजत ठेवा. तुम्ही ते पिण्यापूर्वी एक तास भिजवू शकता. तुम्ही त्यात लिंबाचा रस मिसळूनही पिऊ शकता.

सॅलडसह चिया सीड्स खा

तुम्ही सॅलडबरोबर चिया सीड्सदेखील खाऊ शकता. हे खाण्यासाठी प्रथम सॅलड कापून घ्या आणि नंतर त्यावर चिया सीड्स शिंपडा. आता तुम्ही ते सॅलडबरोबर खाऊ शकता.

चिया सीड्सची पावडर बनवा

तुम्ही चिया सीड्सची पावडर बनवून, ती दुधाबरोबरही घेऊ शकता. त्यासाठी प्रथम चिया सीड्स उन्हात वाळवा. आता ते मिक्सरमध्ये टाका आणि बारीक पावडर बनवा. तुम्ही रात्री दुधात घालूनही ते पिऊ शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lose weight quickly then try these way to consume chia seeds sap