Healthy digestion tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपुरी झोप, बाहेर खाणे, ताणतणाव आणि आपल्या शरीराची योग्य काळजी न घेणे या सर्वांमुळे अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. पचनाचे विकार, जास्त थकवा, रक्तातील साखरेचे असंतुलन आणि फॅटी लिव्हर यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशा परिस्थितीत आपल्या आहारात आणि जीवनशैलीत छोटे बदल करून आपण आपल्या शरीराची काळजी घेऊ शकतो. विशेषतः पालेभाज्या आणि हिरव्या पानांचे सेवन हे पचनासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेद आणि आधुनिक संशोधन दोन्हींनी या पानांच्या महत्त्वावर भर दिला आहे.
डॉ. शालिनी सिंग साळुंके, ज्येष्ठ वरिष्ठ डॉक्टर आणि मधुमेह तज्ञ यांच्या मते, ज्या पालेभाज्या आपण दररोज खातो त्यातील पानांमध्ये अनेक आरोग्यदायी गुण दडलेले आहेत. हे पान शरीरासाठी औषधासमान आहेत आणि त्याचे नियमित सेवन केल्यास अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.
१. टॉक्सिन काढणे :
धूर, प्रदूषण आणि अस्वास्थ्यकर आहारामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होतात. च्या शेवग्याच्या पानांमध्ये विषारी पदार्थ काढून टाकण्याचे गुणधर्म असतात, जे रक्त शुद्ध करतात आणि शरीर स्वच्छ ठेवतात; यामुळे त्वचेला ताजेपणा येतो आणि ऊर्जा वाढते.
२. शरीरातील वेदना कमी करणे :
शेवग्याच्या पानांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे सूज आणि वेदना कमी करतात. एक कप पाण्यात लहान चमचा मेथी पावडर उकळवून दिवसभर हळूहळू पिणे फायदेशीर ठरते.
३. पचनासाठी लाभकारी :
शेवग्याची पानं पचन सुधारतात, खराब बॅक्टेरियाची संख्या कमी करतात आणि पोट हलके ठेवतात. त्याच्या अँटीसेप्टिक आणि पाचक गुणधर्माच्या नियमित सेवनाने तुम्हाला पचनाच्या समस्यांपासून मुक्त ठेवतात.
४.रक्तातील साखरेची पातळी:
इन्सुलिन हे हार्मोन आहे जे रक्तातील साखर (glucose) पेशींमध्ये प्रवेश करून ऊर्जेत रूपांतरित करण्यास मदत करते. त्याचप्रमाणे या या पानांमध्ये असलेले प्रथिने इन्सुलिनसारखे कार्य करून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवतात
५. वजन कमी करणे :
या पानांमध्ये कमी कॅलरी आणि जास्त फायबर असल्याने त्याचे सेवन केल्यानंतर दिर्घकाळ पोट भरल्यासारखे वाटते आणि काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते ज्यामुळे जास्त अन्न खाणे टाळले जाते. हे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते
६. हृदयाचे आरोग्य :
शेवग्याच्या पानांमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म खराब कोलेस्ट्रॉल कमी करतात आणि हृदयासाठी फायदेशीर असतात. एलडीएल कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
दैनिक आहारात शेवग्याची आणि इतर हिरव्या पानांचा समावेश केल्यास शरीर तंदुरुस्त राहते, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि पाचन तंत्र मजबूत होते, त्यामुळे आरोग्याचे रक्षण करण्यासाठी या पानांचा नियमित समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.