Hair Care Tips : केसांच्या समस्येला प्रत्येकाला सामोरे जावे लागते. कोणाचे केस खूप गळतात, तर कोणाचे पांढरे होतात. काही जणांचे केस वाढतच नाहीत किंवा आधी इतके दाट राहत नाहीत. बाजारात मिळणारे शॅम्पू, सिरम आणि तेल तात्पुरता परिणाम देतात, पण कायमस्वरूपी उपाय हवा असेल तर घरगुती उपाय सर्वात चांगले ठरतात. आपल्या आजी-आजोबांच्या काळात केसांची काळजी नैसर्गिकरित्या घेतली जात होती. त्यांच्या सांगितलेल्या काही सोप्या पण परिणामकारक उपायांमुळे केस गळणे कमी होते आणि नवीन केस वाढण्यास मदत होते. तर पुढील ८ उपायांनी तुमचे केस पुन्हा दाट आणि मजबूत बनवतील.

१. नारळाचे तेल

नारळाचे तेल केसांच्या मुळांना बळकट करण्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. नारळाचे तेल गरम करा आणि तुमच्या टाळूवर मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि केसांच्या वाढीस मदत होते.

२. जास्वंदाचे फूल

केसांच्या अनेक समस्यांसाठी जास्वंद किंवा चमेलीचे फूल उपयुक्त आहे. फुलांचा आणि पानांचा लेप टाळूवर लावल्याने केसांची मुळे मजबूत होतात आणि केस गळणे कमी होते.

३. कांद्याचा रस आणि मध

कांद्याचा रस आणि मध एकत्र मिसळून टाळूवर लावल्यास केसांच्या रोमछिद्रांना पोषण मिळते. हे उपाय टक्कल पडण्यावरदेखील प्रभावी आहे आणि नवीन केस वाढण्यास मदत होते.

४. मेथीची पेस्ट

मेथीचे दाणे भिजवून त्याची पेस्ट तयार करा आणि ती केसांवर लावा. यामुळे केस गळणे थांबते आणि केस मऊ, चमकदार दिसतात.

५. कढीपत्ता आणि मोहरीचे तेल

मोहरीच्या तेलात कढीपत्ता उकळून तयार केलेले तेल केसांना मुळापासून पोषण देते. हे तेल नियमित वापरल्यास केस दाट आणि मजबूत होतात.

६. अ‍ॅलोव्हेरा जेल

कोरफडीचे जेल थेट टाळूवर लावल्याने केसांना आर्द्रता मिळते आणि केसांची वाढ जलद होते. हे नैसर्गिक कंडिशनर म्हणूनही काम करते.

७. एरंडीचे तेल

एरंडीचे तेल केसांना खोलवर पोषण देते. रात्री झोपण्यापूर्वी तेल लावून सकाळी केस धुवावेत. यामुळे केसांची लांबी आणि घनता वाढते.

८. तांदळाचे पाणी

तांदळाचे पाणी केसांना लवचिकता देते आणि तुटणारे केस काही प्रमाणात कमी होतात. आठवड्यातून दोनदा तांदळाच्या पाण्याने केस धुतल्यास केस मऊ आणि मजबूत होतात.

हे सोपे घरगुती उपाय नुसते केसांचे सौंदर्य वाढवत नाहीत, तर त्यांना नैसर्गिक ताकद आणि आरोग्यही देतात. नियमित वापर केल्यास तुम्हाला फरक जाणवेल!