Green Vegetable Juice For Weight Loss: तुम्हीही पोटाची वाढती चरबी पाहून त्रासलेले आहात का? कितीही व्यायाम केला, कितीही डाएट केलं तरी पोटावरची ‘ती’ हट्टी चरबी काही केल्या कमी होत नाही… मग आता तुमच्यासाठी आहे एक नैसर्गिक उपाय, हिरव्या भाज्यांचे ज्यूस. होय, हे ज्यूस फक्त वजन कमी करत नाहीत तर शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढून मेटाबॉलिझम वाढवतात. ‘या’ पाच हिरव्या भाज्यांचे ज्यूस जर तुम्ही रोज प्यायला सुरुवात केली तर काही दिवसांतच फरक दिसू लागेल.

‘या’ ५ हिरव्या भाज्यांचे पेय आजपासूनच प्यायला सुरुवात करा; कंबरेचा घेर व वजन होईल कमी

१. सफरचंद, किवी आणि पालक ज्यूस

हा ज्यूस केवळ पौष्टिक नाही तर वजन कमी करण्यासाठी एक ‘फॅट-किलर ड्रिंक’ आहे. सफरचंदात असलेले पेक्टिन फायबर पोटाभोवती जमा होणारी चरबी कमी करते. किवीमधील व्हिटॅमिन C चरबी वितळवण्यास मदत करते आणि पालकात भरपूर फायबर असल्याने दीर्घकाळ पोट भरलेले वाटते. परिणामी, भूक कमी लागते आणि अनावश्यक खाणं टाळता येतं. हा हिरवा ज्यूस दररोज सकाळी उपाशीपोटी प्यायल्यास पोटातील चरबी हळूहळू वितळताना तुम्हाला दिसेल.

२. काकडी आणि आले ज्यूस

काकडी म्हणजे वजन कमी करण्याचं सर्वात सोपं आणि प्रभावी रहस्य. यात ९५% पाणी असतं आणि जवळपास कॅलरी शून्य. त्यात आले टाकल्यावर हा ज्यूस बनतो एक ‘मेटाबॉलिझम बूस्टर.’ आल्याचं थर्मोजेनिक इफेक्ट शरीराचं तापमान वाढवतो आणि फॅट जाळण्याची प्रक्रिया वेगाने घडवतो. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास काकडी-आले ज्यूस प्यायल्यास दिवसभर शरीरातील फॅट वितळत राहील, असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.

३. सफरचंद आणि काकडीचा संयुक्त ज्यूस

हा ज्यूस हलका, थंडावा देणारा आणि अत्यंत ताजेतवाने करणारा आहे. सफरचंदातील फायबर आणि काकडीतील हायड्रेशन यांचा संगम शरीरात पाण्याचं प्रमाण संतुलित ठेवतो. हा ज्यूस वर्कआउटनंतर प्यायल्यास फॅट बर्निंग प्रक्रिया दुप्पट वेगाने होते. दररोज या ज्यूसचा एक ग्लास प्यायल्याने केवळ पोटाचं फॅटच नाही तर शरीरातील सूज, गॅस आणि फुगलेपणाही कमी होतो.

४. दुधी भोपळा ज्यूस (लौकी)

आयुर्वेदात दुधी भोपळा म्हणजे शरीर शुद्ध करणारा ‘रामबाण उपाय.’ हा ज्यूस कॅलरीमध्ये कमी आणि फायबरमध्ये जास्त असल्याने तो शरीरातील विषारी घटक बाहेर काढतो. दररोज सकाळी एक ग्लास दुधी भोपळ्याचा ज्यूस घेतल्याने शरीर हलकं वाटतं, पचन सुधारतं आणि चरबी कमी होऊ लागते. अनेक फिटनेस एक्सपर्ट्सच्या मते, “लौकी ज्यूस हा नैसर्गिक फॅट बर्नर” आहे. विशेषतः पोटाभोवती जमा झालेल्या चरबीवर तो प्रभावी ठरतो.

५. पालक, काकडी आणि लिंबाचा ज्यूस

हा ज्यूस म्हणजे एक ‘डिटॉक्स ड्रिंक’! पालकातील आयरन आणि फायबर शरीराला ऊर्जा देतात, काकडी शरीर थंड ठेवते आणि लिंबामधील व्हिटॅमिन C फॅट बर्निंग प्रक्रियेला गती देतो. व्यायामानंतर हा ज्यूस प्यायल्यास चरबी वितळण्याची गती वाढते. शरीर हलकं, त्वचा चमकदार आणि पोट सपाट दिसू लागतं.

शेवटी लक्षात ठेवा, हे ज्यूस जादू करणार नाहीत जर तुम्ही अस्वस्थ आहार घेत असाल. पण योग्य डाएट आणि थोडा व्यायाम यांच्यासोबत या पाच हिरव्या ज्यूसचं सेवन केल्यास तुमचं पोट स्वतःच कमी होताना तुम्हाला आरशात दिसेल.

आता प्रश्न आहे, तुम्ही कोणत्या ज्यूसपासून सुरुवात करणार आहात? सफरचंद-पालक की काकडी-आले?

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)