आचार्य चाणक्य एक महान अर्थशास्त्रज्ञ आणि रणनीतिकार होते. त्यांनी लिहिलेल्या नीतिशास्त्रात संपत्ती, मालमत्ता, महिला, मित्र, करिअर आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित अनेक गोष्टींचा सखोल उल्लेख केला आहे. आचार्य चाणक्य यांनी नेहमीच आपल्या धोरणांनी समाजाला मार्गदर्शन केले आहे. जो व्यक्ती आचार्य चाणक्यांच्या धोरणांचे पालन करतो त्याची प्रगती होते, असे मानले जाते. आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही लोकांचा उल्लेख केला आहे, त्यांच्याशी कधीही शत्रुत्व करू नये. अन्यथा तुम्हाला महागात पडू शकते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
  • खास मित्राशी कधीही शत्रुत्व करू नका: ज्याला तुमची सर्व रहस्ये माहित आहेत, अशा लोकांशी कधीही शत्रुत्व करू नये. कारण जर तुम्ही तुमच्या खास मित्राशी शत्रुत्व केले तर तो तुमची गुपिते उघड करू शकतो. कारण जो मित्र लहानपणापासून तुमच्यासोबत खेळला आहे आणि एकत्र वाढला आहे. त्याला तुमची सर्व गुपिते माहिती असतात आणि जेव्हा भांडण होईल तेव्हा तो तुमची कमकुवत बाजू सर्वांसमोर उघड करेल.
  • मूर्खासमोर कुणाची निंदा करू नये: मूर्ख माणसांसमोर कधीच कुणाची निंदा करू नये. कारण मूर्ख माणसाला स्वतःच्या हिताचे किंवा नुकसानीचे ज्ञान नसते. मूर्ख माणूस काहीही विचार न करता काहीही बोलतो आणि तुमचे नुकसान होऊ शकते.
  • डॉक्टरांशी कधीही वैर करू नये: वैद्य म्हणजेच डॉक्टरांशी वैर नसावे. कारण असे केल्याने भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते. डॉक्टर हे देवाचे रूप मानले जाते. डॉक्टरांशी वैर असेल तर वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
  • श्रीमंत व्यक्ती: विसरुनही श्रीमंत लोकांशी वैर करू नये. कारण अशी व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी कोणालाही विकत घेऊ शकते. पैसे वापरून तुमचे नुकसान करू शकते.
  • जेवण बनवणारी व्यक्ती: कोणी अन्न शिजवते त्याचा कधीही मत्सर करू नये. कारण असे लोक अन्नात काहीही मिसळून तुम्हाला खाऊ घालू शकतात. यामुळे तुमचा मृत्यूही होऊ शकतो. त्यामुळेच स्वयंपाक्यासोबत भांडण करू नये.
  • हातात शस्त्र असलेला व्यक्ती: हातात शस्त्रे असलेल्या व्यक्तीशी कधीही भांडण करू नये. कारण अशी व्यक्ती रागाच्या भरात आपल्या शस्त्राचा वापर करू शकते आणि तुम्हाला शारीरिक हानी करू शकते. म्हणूनच हातात शस्त्र असणाऱ्या व्यक्तीशी कधीही युद्ध करू नये.
मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Never hate these people says chanakya niti rmt