Benefits Of Pistachio: हिवाळ्यात तुमची त्वचा कोरडी आणि निस्तेज बनू शकते. तुम्ही कितीही महागडे क्रीम किंवा इतर उत्पादनं वापरली तरी निस्तेज रंग ही एक समस्या असू शकते. क्रीम वगैरे लावून तुम्ही वरून त्वचेचं संरक्षण करू शकता, पण मुळात शरीरातून पोषण मिळाल्यास हिवाळ्यात तुम्हाला कोरड्या, निस्तेज त्वचेचा त्रास फार होणार नाही. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयानेही पिस्ता हा त्वचेसाठी एक उत्तम पदार्थ असून त्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे.

पिस्ता खाण्याचे फायदे

तुमच्या आहारात पिस्त्याचा समावेश करणे अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, पिस्ता त्वचेला सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई त्वचेला खोलवर पोषण देते आणि तिची चमक कायम ठेवते. पिस्ता केवळ स्वादिष्टच नाही तर आरोग्य आणि सौंदर्यासाठी सुपरफूड आहे. ते व्हिटॅमिन ई ने समृद्ध आहे, जे त्वचेला मॉइश्चराइज करते, मऊ ठेवते आणि कोरडेपणा दूर करते. पिस्तामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्सही असतात, ते अँटीएजिंगसाठी महत्त्वाचे ठरतात.

त्वचेसाठी फायदेशीर पिस्ता

पिस्ता खाल्ल्याने सुरकुत्या, बारीक रेषा आणि निस्तेजपणा रोखण्यासाठी मदत होते. पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा रंग सुधारण्यासह अनेक फायदे होतात. व्हिटॅमि ई मुक्त रॅडिकल्सशी लढते, त्वचा तेजस्वी आणि तरूण ठेवते. बायोटिन आणि प्रथिने समृद्ध असलेला पिस्ता केस गळती रोखतो आणि केसांची चमक वाढवतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत

पिस्ता कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो आणि हृदयाचे आरोग्य राखतो. पिस्तामध्ये भरपूर फायबर असते, जे भूक कमी करते आणि वजन नियंत्रित करण्यास मदत करते. यामधील झिंक आणि व्हिटॅमिन बी६ रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. ते डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहेत.

पिस्ताचे सेवन कसे करावे?

पिस्तामध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन असते. ते दृष्टी टिकवून ठेवण्यास मदत करते. तज्ज्ञांच्या मते, भाजलेले पिस्ते रिकाम्या पोटी किंवा नाशत्यात दुधासोबत खाणे फायदेशीर आहे. तुमच्या आहारात पिस्त्याचा समावेश केल्याने अनेक फायदे होतात. अॅलर्जी आणि किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच पिस्त्याचे सेवन करावे.