How To Overcome Hiccups Instantly: तुम्हाला उचकी येत असेल तर कोणीतरी तुमची आठवण काढते असे म्हटले जाते. मात्र, विज्ञानात उचकी या शब्दाची व्याख्या पूर्णपणे वेगळी आहे. उचकी तेव्हा येते जेव्हा डायाफ्राम आणि इंटरकोस्टल स्नायू अचानक आकुंचन पावतात आणि त्याचवेळी घशातील व्हॉइस बॉक्सदेखील आकुंचन पावतो. यामुळे स्वरयंत्र बंद होतात, घशातील हवा अडवतात आणि उचकी येते. उचकी साधारणपणे काही काळानंतर आपणहून थांबते. असं असताना जर ती बराच वेळ येत राहिली तर काही उपाय ती थांबवण्यास मदत करू शकतात.

उचकी येण्याची कारणं

उचकी येण्यामागे वैज्ञानिक कारण स्पष्ट असलं तरी बहुतेकदा हवामान बदलते तेव्हासुद्धा उचकी लागते, थंडीपासून गर्मीपर्यंत किंवा गरम अन्नानंतर लगेच थंड अन्न अशा परिस्थितीत. कधीकधी जास्त काळजी केल्यानेदेखील उचकी येऊ शकते.

उचकी कशी थांबवायची?

उचकी थांबवण्याचे अनेक मार्ग आहेत. ते वापरून पाहिल्यास आराम मिळू शकतो. तुम्ही काही सोप्या पण प्रभावी टिप्स देखील शिकायला पाहिजेत.

१. थोडा वेळ श्वास रोखा – सतत उचकी येत असेल तर १० सेकंद श्वास रोखून ठेवा. नंतर दोनदा श्वास घ्या आणि पुन्हा श्वास सोडा.

२. छाती दाबा – तुमचे गुडघे तुमच्या छातीजवळ आणा आणि त्यांना दाबा. पुढे वाकून हळूहळू तुमच्या छातीवर गुडघे दाबा. जर या प्रक्रियांनी उचकी थांबली नाही तर तुम्ही काही घरगुती उपायही करू शकता.

३. पाणी उलटे प्या – पाणी उलटे पिणे याचा शब्दश: अर्थ घेऊ नका. म्हणजे जेव्हा तुम्हाला उचकी येत असेल तेव्हा एक ग्लास पाण्याने भरा आणि तुमच्या ओठांच्या विरूद्ध बाजूने प्या. चार किंवा पाच घोट प्या आणि जेव्हा ग्लासमधील पाणी कमी होऊ लागते तेव्हा डोके वाकवा आणि उरलेले पाणी प्या. हे कठीण आहे पण प्रभावी आहे.

४. मनगट दाबा – पहिली उचकी येताच लगेच तुम्ही तुमचे मनगट दाबले, तर त्यामुळे थोड्या वेळातच उचकी थांबेल.

५. जीभ दाबा – जर तुम्हाला उचकीचा त्रास होत असेल तर तुमची जीभ हळूवारपणे ओढा. यामुळे व्हॅगस नर्व्ह सक्रिय होते आणि तुमच्या डायाफ्राममधील आकुंचन कमी होते.