Raw Papaya For Weight Loss: वजन कमी करण्यासाठी कच्ची पपई खाण्याचे अनेक फायदे आहेत. वजन कमी करण्यासह पपई शरीरातील चरबीदेखील सहज कमी करते. त्यात पेपेन एंजाइम आणि फायबर असते, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. पपई खाल्ल्याने शरीर ऊर्जावान राहते. पिकलेली पपई आपण सहज खातो, परंतु कच्च्या पपईचे सेवन नेमके कसे करावे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खरंतर, कच्च्या पपईचे सूप बनवून तुम्ही सेवन करू शकता.

कच्ची पपई खाण्याचे फायदे

  • कच्च्या पपईमुळे पोटात खोलवर साचलेली चरबी कमी होण्यास मदत होते
  • पेपेन एंजाइम आणि फायबरची उपस्थिती पचनक्रिया वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे चरबीचे विघटन जलद होते.
  • कच्ची पपई खाल्ल्याने मेटाबॉलिज्म सुधारते.
  • पपई खाल्ल्याने त्वचा चमकदार राहते, तसेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते.

कच्च्या पपईचे सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ कप कच्ची पपई
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ३ पाकळ्या लसूण
  • १ कांदा
  • १ टोमॅटो
  • काळी मिरी
  • गुलाबी मीठ
  • १ चमचा तूप
  • २ कप पाणी
  • चिमूटभर हळद

कच्च्या पपईचे सूप कसे बनवायचे?

कच्च्या पपईचे सूप बनवण्यासाठी प्रथम पपई सोलून घ्या, बारीक काप करा. आता एका पॅनमध्ये तूप गरम करून त्यात लसूण, आलं आणि कांदा हलका परतून घ्या. त्यानंतर टोमॅटो घालून आणि ते मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात कच्ची पपई घालून हे मिश्रण २-३ मिनिटे परतून घ्या. आता त्यात २ कप पाणी ओतून त्यामध्ये हळद, काळी मिरी आणि मीठ घाला. १५-२० मिनिटांसाठी मध्यम आचेवर झाकण ठेवून हे मिश्रण शिजू द्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट बनवा. आता सूप पुन्हा एका भांड्यात घालून उकळून घ्या. अशाप्रकारे कच्च्या पपईचे सूप तयार होईल.