Symptoms of High Blood Pressure at Night: हाय ब्लड प्रेशर हा एक सायलेंट किलर आहे. कारण त्याची लक्षणे खूप सामान्य आहेत. बहुतेक लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. वेळीच ही लक्षणे ओळखल्यास यापासून बचावात्मक उपाय करता येऊ शकतात. पण तुम्हाला माहीत आहे का काहीतरी त्रास झाल्यावरच आपल्याला कुठला तरी आजार आहे की काय अशा शंका येतात. रोजच्या दिनचर्येत काही वेळा अशी अनेक लक्षणे आपल्या समोर असतात जी गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. रात्री झोपताना हाय ब्लड प्रेशरची लक्षणे जास्त प्रमाणात दिसून येतात. या लक्षणांबाबत सविस्तर जाणून घेऊ…

घाम येणे

जर तुम्हाला झोपताना घाम येत असेल, अगदी पंखा किंवा एसी चालू असतानाही रात्रीच्या वेळी झोपताना घाम येत असेल तर हे हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला रात्री जास्त वेळ घाम येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

श्वास घेण्यास त्रास होणे

रात्री झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर ते हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते. झोपताना श्वास घेण्यास त्रास होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या.

वारंवार लघवी होणे

जर तुम्हाला रात्री वारंवार लघवी होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. रात्री वारंवार लघवी होणे हे हाय ब्लड प्रेशर किंवा मधुमेहाचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला बऱ्याचदा रात्री लघवी होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांना भेट द्या.

थकवा

तुम्ही खूप थकलेले आहात आणि तुम्ही व्यवस्थित विश्रांती घेतली आहे, रात्री झोप चांगली घेतली पण तरीही तुम्हाला थकवा जाणवत असेल तर ते हाय ब्लड प्रेशरचे लक्षण असू शकते. जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.