Chili Cutting Tips: स्वयंपाक करताना हिरवी मिर्ची कापण्याची गरज रोज पडते पण, ती कापल्यानंतर कित्येकवेळा हाताची जळजळ होऊ लागते. कित्येकवेळा हात स्वच्छ धूतला तरीही कमी होत नाही किंवा कधी कधी मिरची कापल्यानंतर हात चुकून चेहऱ्याला लागला तर त्वचेची प्रंचड जळजळ होते. अशा वेळी मिरची कापल्यानंतरआपल्या हाताची किंवा त्वचेची होणारी जळजळ शांत करण्यासाठी काही सोपे उपाय तुम्ही वापरून शकता. चला जाणून घेऊ या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरफड वापरा : हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हातांना होणारी जळजळ थांबविण्यासाठी आपल्या हाताला कोरफड किंवा कोरफडची जेल लावू शकता. त्यासाठी कोरफड मधोमाध कापा आणि त्याच गर तुमच्या हातांवर चोळा किंवा एक चमचा कोरफड जेल घ्या आणि तुमच्या हातांना लावा.

हेही वाचा – साधं ऑम्लेट नेहमीच खाता, आता खाऊन पाहा स्पॅनिश ऑम्लेट! अगदी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी

कणीक मळा: हाताला मिरचीमुळे होणारी जळजळ थांबविण्यासाठी कणिक मळा. त्यामुळे हाताला होणारी जळ जळ दूर करण्यासाठी मदत मिळेल. तुम्ही मग कणिक मळा आणि ही क्रिया ७-८ मिनिट करत राहा आणि जोपर्यंत आराम मिळणार नाही तोपर्यंत करत राहा.

थंड तेल हाताला लावा :
हातांची जळजळीपासून सुटका मिळवायची असेल तर थंड तेल लावा. तुम्हाला हवे असल्यास पेपंरमिटं तेल वापरू शकता. त्यामुळे तुमच्या हातांना थंडवा जाणवेल आणि तुमच्या हाताना मॉइश्चराईज देखील होतील.

हेही वाचा –वांग्याचं ऑम्लेट, कॉम्बिनेशन विचित्र पण, चव अगदी मस्तं! झटपट होईल तयार, ही घ्या रेसिपी

दही लावा : मिरची कापल्यानंतर हाताना होणारी जळजळ कमी करण्यासाठी दही वापरू शकता. त्यासाठी थंड दही हातांवर घेऊन पाच मिनिटांमध्ये मसाज करा. तुम्हाला जळजळपासून त्वरित सुटका मिळेल.

मिरची कापताना ग्लव्हज वापरा – मिरची कापताना हातांना ग्लव्हज घालणे उत्तम होईल. त्यामुळे हाताची होणारी जळजळ टाळता येऊ शकते आणि मिरची कापल्यानंतर ग्लव्हज काढताना सावधगिरी बाळगा आणि त्याला उलटे करून काढा

चॉपिंग बोर्डचा वापरा करा – मिरची कापल्यानंतर एका चाकूऐवजी चॉपिंग बोर्ड किंवा कैंचीचा वापर करा. त्यानंतर हातांची जळजळ होत नाही. जर तुम्हाला चॉपिंग बोर्ड नसेल तर तुम्ही चपाती लाटण्याचा पोळपाट वापरू शकता. त्यामुळे हातांची जळजळ टाळता येणे शक्य होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tips and tricks 6 amazing tips to get rid of hands burning after chilli cutting you should must follow snk