Valentines day makeup tips : १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन्स डे. कॉलेजच्या तरुणांपासून ते अनेक विवाहित जोडप्यांसाठी हा दिवस खास आहे. या दिवशी अनेक जोडपी आपल्या जोडीदारासाठी काहीतरी खास, विशेष अशी गोष्ट करण्याचा प्रयत्न करतात. काही सिनेमा पाहण्यासाठी जातात, तर काही डिनर डेटचे नियोजन करतात; तर काही खास या दिवशी आपल्या जोडीदाराला लग्नाची मागणी घालतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मग या अशा खास दिवशी आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटत असते. नाही का? मात्र, त्यासाठी नेमका कोणत्या पद्धतीचा मेकअप करावा असा अनेक जणींना प्रश्न पडलेला असतो. कपड्यांना आणि वेळेला साजेल अशा पद्धतीने चेहऱ्यावर लिपस्टिक, आयशॅडो लावल्याने किंवा अगदी विशिष्ट प्रकारे काजळ, आयलायनर लावल्यास चेहरा अतिशय मोहक दिसतो, खुलून येतो. यंदाच्या व्हॅलेंटाईन डेनिमित्त कोणत्या पद्धतीचा मेकअप तुम्ही करू शकता ते पाहा.

हेही वाचा : Skin care : केवळ पूजेसाठी नव्हे, तर त्वचेसाठीही करा तुळशीचा वापर! पाहा या पाच टिप्स

१. सॉफ्ट पिंक आयशॅडो

प्रेम दर्शवण्यासाठी आपण लाल, गुलाबी रंगांचा वापर करतो. त्याप्रमाणे तुम्ही एखाद्या डेटवर जाणार असल्यास फिक्या गुलाबी रंगाच्या आयशॅडोचा वापर करू शकता. गुलाबी आणि हलक्या सोनेरी रंगाचा आयशॅडो डोळ्यांवर लावा. तसेच पापण्यांना मस्कारा आणि ओठांवर न्यूड शेडची एखादी लिपस्टिक लावावी. या सर्वांमुळे तुमचा चेहरा गुलाबाच्या फुलासारखा खुलून दिसेल.

२. स्लॅटरी स्मोकी आय

तुम्हाला जर थोडासा जड आणि ड्रामॅटिक मेकअप हवा असल्यास, स्लॅटरी स्मोकी आय मेकअपचा प्रयोग करू शकता. या प्रकारचा मेकअप करण्यासाठी तुम्ही ब्रॉन्झ, कॉपर, प्लम अशा थोड्या वॉर्म टोनच्या आयशॅडोची निवड करा. त्यासह काळ्या रंगाचे आयलायनर लावावे. यामुळे तुमचे डोळे उठून दिसतील. सर्वात शेवटी पापण्यांना मस्कारा आणि ओठांवर न्यूड किंवा मॉव्ह [पर्पल/जांभळा रंग] रंगाची लिपस्टिक लावावी, यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसेल.

हेही वाचा : आरोग्य जपायचे तर प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी नकोच! मात्र असे का? त्याची करणे जाणून घ्या…

३. बोल्ड आयलायनर

तुम्हाला जर फार मेकअप करायला आवडत नसेल तर केवळ आयलायनर लावूनही तुमचा लूक बदलू शकता. यासाठी तुम्ही काळ्या रंगाव्यतिरिक्त निळ्या, हिरव्या किंवा तुम्ही घातलेल्या कपड्यांना साजेश्या रंगाच्या आयलायनरची निवड करू शकता. तसेच जाड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे विंग लायनर लावून पाहू शकता. जाड आयलायनरसह, हवा असल्यास अगदी हलका किंवा फिका मेकअप करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Valentine day 2024 makeup tips try these tree makeup looks for special day dha