Video Remove Ink Stains From Shirts: अलीकडे पेन- पेन्सिल अशा वस्तूंचा वापर कमी झाला असला तरी अजूनही शाळा- कॉलेजमध्ये या वस्तूंचे स्थान अबाधित आहे. शाळा- कॉलेजमधील मुलं म्हटली की अल्लडपणा, मजा- मस्ती ही आलीच, आणि या मजा मस्तीत अनेकदा त्यांच्या गणवेशाचे तीन तेरा वाजतात. अर्थात याचा त्या चिमुकल्या जीवांच्या मनात विचारही नसला तरी ज्याला घरी कपडे धुण्याची ड्युटी असते त्याच व्यक्तीला असे हट्टी डाग काढण्याचे कष्ट माहित असतील. एखाद्या वेळेस जेवणाचे डाग किंवा रंगांचे डाग काढणं तरी सोपं असतं पण शाईचे डाग पडलेले शर्ट स्वच्छ करणं ही अत्यंत मेहनतीची जबाबदारी ठरते. पण आज आपण एका असा भन्नाट जुगाड पाहणार आहोत ज्यामुळे इन मिन मोजून ३० सेकंदात आपण शाईचे डाग पडलेला शर्ट धुवून लक्ख करू शकता.
@masterinhacks या अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला शाईचे डाग काढण्यासाठी कुठल्याच साबण- पावडरची गरज लागणार नाही. तुम्हाला फक्त सॅनिटायजर घेऊन ब्रशला लावून शाईच्या रेघोट्यांचा भाग घासून स्वच्छ करायचा आहे. यानंतर तुम्ही थंड पाण्याखाली धरून हा शर्ट स्वच्छ धुवून घ्या.
Video: साबण पावडर शिवाय शर्ट कसा स्वच्छ करायचा?
हे ही वाचा<< संध्याकाळी ७ नंतर जेवल्यावर वजन वाढतं का? तज्ज्ञांनी सांगितलेल्या चुका तुम्हीही करताय का?
दरम्यान, या व्हिडीओखाली काहींनी केलेल्या कमेंटनुसार हा जुगाड त्यांनी करून पाहिल्यावर उत्तम रिझल्ट आल्याचे लिहिले आहे. त्यामुळे तुम्हीही पुढच्या वेळी ही जुगाडू हॅक नक्की वापरून पाहा व कसा फायदा होतोय हे नक्की कळवा.