रोजच्या जीवनात आवश्यक असणाऱ्या गोष्टींमध्ये टूथब्रशचा समावेश होतो. याच्या मदतीने आपण दात स्वच्छ करून, अनेक आजरांना लांब ठेऊ शकतो. यासाठी टूथब्रश निवडताना काही गोष्टी लक्षात ठेवण्याचा सल्ला दिला जातो. तसेच टूथब्रश बदलण्याचा कालावधी, टूथब्रश ठेवण्याची जागा अशा काही महत्त्वाच्या गोष्टी सर्वांना माहीत असणे आवश्यक असते, याविषयी जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टूथब्रश बदलण्याचा कालावधी
‘सेंटर फॉर डीजीज प्रीवेंशन अँड कंट्रोल’नुसार ३ ते ४ महिन्यांच्या कालावधीनंतर टूथब्रश बदलावा. टूथब्रश जर खराब झाला नसेल, तर तो बदलायचा कशाला असे काहीजणांचे मत असते. पण हे चुकीचे आहे, टूथब्रशच्या वापरानुसार त्याची क्षमता कमी होते. त्यामुळे दात अस्वच्छ राहू शकतात.

आणखी वाचा: Kitchen Tips: स्वयंपाकघरातील करपलेली भांडी लगेच होतील स्वच्छ; फक्त वापरा या सोप्या टिप्स

टूथब्रश ठेवण्याची जागा
टूथब्रश ठेवण्याच्या जागेचाही आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. यामागचे कारण म्हणजे अनेकजण बाथरूममध्ये टूथब्रश ठेवतात. बाथरूममधील दमट वातावरणाचा टूथब्रशवर परिणाम होण्याची शक्यता असते. तसेच फ्लशचा वापर केल्यानंतर ते बाथरूममधील हवेत पसरण्याची शक्यता असते. जे ब्रशवरही जमा होऊ शकतात. त्यामुळे ब्रश योग्यजागी ठेवावा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the right time to change toothbrush how it affects health know more pns
First published on: 05-12-2022 at 12:26 IST