Milk Boiling Ayurveda: दूध उकळण्यासाठी कोणते भांडे चांगले आहे? कोणत्या धातूच्या भांड्यात दूध उकळवल्याने काय परिणाम होतात? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? वास्तविक काही भांड्यांमध्ये दूध उकळल्याने त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो. अशा स्थितीत दूध कोणत्या भांड्यात उकळायचे याची माहिती जाणून घेणे खूप आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याच विषयासंदर्भातील माहिती देणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुर्वेदानुसार दूध उकळण्यासाठी चांगले भांडे कोणते?

आयुर्वेदात आरोग्याबाबत जागरूक राहण्यासाठी ॲल्युमिनियम, स्टेनलेस स्टीलऐवजी माती व पितळेची भांडी वापरण्यास प्राधान्य दिले जाते. त्यात जेवण बनवणे, दूध, पाणी उकळवण्यासाठी किंवा खीर किंवा दुधाचा कोणताही पदार्थ बनवण्यासाठी पुरेशी जागा असते.

असे मानले जाते की, दूध उकळल्याने त्याचे पौष्टिक मूल्य मोठ्या प्रमाणात कमी होते. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, दूध उकळताना कच्च्या दुधातील जीवाणू निघून जातात. दुधामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण कमी असू शकते. त्यामध्ये जीवनसत्त्वे बी२, बी३, बी६ व फॉलिक अॅसिड समाविष्ट आहे. म्हणून दूध उकळण्यासाठी योग्य भांड्यांचा वापर करायला हवा.

हेही वाचा: कोणत्याही पदार्थांमध्ये दह्याचा सतत वापर करणं ठरू शकतं घातक? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

पितळेच्या भांड्यात दूध तापवावे का?

पितळेत तांबे आणि जस्त या दोन धातूंचे मिश्रण असते, जे दुधात असलेल्या लॅक्टिक अॅसिडवर प्रतिक्रिया देते आणि त्यामुळे दूध खराब होऊ शकते. त्यामुळे पितळेच्या भांड्यात दूध उकळणे टाळावे. परंतु, तुम्ही काचेच्या, मातीच्या, ॲल्युमिनियम किंवा स्टेनलेस स्टीलच्या ग्लासमध्ये दूध पिणे निवडू शकता. केवळ पितळेच्या आणि तांब्याच्या भांड्यातून दूध पिऊ नका. कारण- त्यामुळे पोटदुखी, जुलाब आणि इतर अनेक समस्या उद्भवू शकतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Which metal vessel is used to boil milk for drinking sap