Dates Benefits: खजुरामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात. त्यात फायबर, आयर्न, कॅल्शियम, पोटॅशियम व मॅग्नेशियम असल्याने त्याला सुपरफूड म्हणतात. खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूर उष्ण असतो. त्यामळे तुमच्या दैनंदिन आहारात त्याचे सेवन तुम्ही मर्यादित स्वरूपात करू शकता. जर तुम्ही त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले, तर ते शरीराला फायदेशीर ठरते.

खजुरात दडलाय अनेक पोषक घटकांचा खजिना

खजुरामध्ये फायबर, लोह, पोटॅशियम, मॅग्निशियम, व्हिटॅमिन आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात. त्यामुळे शरीराची केवळ ऊर्जाच वाढत नाही, तर उन्हाळ्यातील संभाव्य अशक्तपणामुळे येणारा थकवाही कमी होतो. तसेच पाण्याची कमतरताही भरून काढण्याची क्षमताही खजुरामध्ये आहे.

खजुराचे फायदे खालीलप्रमाणे:

त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर

खजूर केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. त्यामधील व्हिटॅमिन-सी आणि अँटीऑक्सिडंट्स त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात. खजूर शरीराला आतून डिटॉक्स करतात, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि चमकदार दिसते.

शरीराला हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर

खजुरामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढतात. तुम्ही रात्री खजूर पाण्यात भिजत ठेवून, ते सकाळी खाऊ शकता. त्यामुळे शरीरालाही थंडावा मिळतो.

पचन चांगले होते

खजूरामुळे पचनक्रिया सुधारते. त्यात असलेले घटक पोट सहजतेने स्वच्छ करतात. दररोज दोन ते तीन खजूर खाल्ल्याने पोट साफ राहते आणि त्यामुळे चयापचय क्षमतादेखील चांगली सुधारते. परिणामी पचन व्यवस्थित होते.

खजूर ताण कमी करण्यास फायदेशीर

खजूर खाल्ल्याने ताण कमी होतो. त्यामधील अँटी ऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि खनिजेदेखील तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवतात. खजुरामध्ये नैसर्गिक साखर आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे मन शांत होऊन, ताण कमी करण्यास मदत मिळते.