Live Updates
08:55 (IST) 31 Jan 2017
गुजरातमधील दहेज भागात स्टर्लिंग कंपनीमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल
08:36 (IST) 31 Jan 2017
पुण्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडी होणार नाही, सूत्रांची माहिती, दोन्ही पक्षांकडून लवकरच होणार अधिकृत घोषणा
07:56 (IST) 31 Jan 2017
बसच्या संपामुळे, विद्यार्थ्यांचे हाल, पालकांना घेऊन जावे लागले मुलांना शाळेत
07:44 (IST) 31 Jan 2017
सकल मराठा मोर्चातर्फे आज राज्यभर ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन
07:23 (IST) 31 Jan 2017
चिंचवडजवळ रेल्वे रूळाला तडे गेल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सर्व एक्स्प्रेस खोळंबल्या
05:03 (IST) 31 Jan 2017
भाजप-शिवसेना निवडणुकीनंतर एकत्र येतील – चंद्रकांत पाटील
03:06 (IST) 31 Jan 2017

पुणे पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी नाही

23:09 (IST) 30 Jan 2017
भानुशाली यांचा सोमवारी संध्याकाळी भाजपमधून शिवसेनेत प्रवेश, निवडणुकीचं तिकीट नक्की झाल्याने शिवसैनिक नाराज
23:09 (IST) 30 Jan 2017
मुंबईः घाटकोपरमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ, मंगल भानुशालींच्या गाडीची कार्यकर्त्यांनी केली तोडफोड.
22:55 (IST) 30 Jan 2017
मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; उमेदवारांची यादी अंतिम होण्याची शक्यता
22:11 (IST) 30 Jan 2017
हाफिज सईद पाकिस्तानमध्ये नजरकैदेत; पाकिस्तानी प्रसारमाध्यमांची माहिती
21:02 (IST) 30 Jan 2017
पुण्यातील मनसेचे गटनेते रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
20:42 (IST) 30 Jan 2017
टाकी साफ करण्यासाठी आतमध्ये उतरलेले कर्मचारी विषारी वायूने बेशुद्ध
20:41 (IST) 30 Jan 2017
लातूर: एमआयडीसीमध्ये तेल कंपनीत अपघात; विषारी वायूची गळती
20:35 (IST) 30 Jan 2017
कोल्हापुरातील ४५ हजार शेतकऱ्यांचे ११२ कोटींचे पीककर्ज माफ
18:13 (IST) 30 Jan 2017
मनसे युतीसाठी तयार आहे- बाळा नांदगावकर
18:12 (IST) 30 Jan 2017
बाळा नांदगावकर यांची लाईव्ह पत्रकारपरिषद
17:59 (IST) 30 Jan 2017
मोदी खूप बोलतात, चांगले बोलतात, फक्त कोणाचेही ऐकत नाहीत- राहुल गांधी
17:23 (IST) 30 Jan 2017
एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा १ फेब्रुवारीपासून हटवणार, रिझर्व्ह बँकेची घोषणा
17:17 (IST) 30 Jan 2017
एटीएममधून पैसे काढण्यावर असलेली मर्यादा १ फेब्रुवारीपासून हटवली जाणारः RBI
17:04 (IST) 30 Jan 2017
खंडाळा स्टेशनजवळील बोगद्याजवळ मोठा दगड कोसळला; एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
16:57 (IST) 30 Jan 2017
भाजपने विजय मल्ल्यासंदर्भात केलेल्या आरोपांना काँग्रेसकडून उत्तर दिले जाण्याची शक्यता
16:57 (IST) 30 Jan 2017
भारतीय अर्थव्यवस्था वाईट अवस्थेत आहे- पी. चिदंबरम
16:56 (IST) 30 Jan 2017
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि पी. चिदंबरम यांची दिल्लीत पत्रकार परिषद
16:55 (IST) 30 Jan 2017
खंडाळा स्टेशनजवळ बोगद्यात दगड पडून अपघात; एका रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू
16:25 (IST) 30 Jan 2017
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी कॅगचे माजी महालेखापरिक्षक विनोद राय यांची नियुक्ती, रामचंद्र गुहा, विक्रम लिमये प्रशासकीय समितीवर
15:54 (IST) 30 Jan 2017
युतीसाठी अद्याप कुणाचा प्रस्ताव नाही-उद्धव ठाकरे
15:07 (IST) 30 Jan 2017
अमूल्य पटनाईक दिल्लीचे नवे पोलीस आयुक्त
14:28 (IST) 30 Jan 2017
ना कमळ, ना हत्ती.. कोणीही सायकलचा सामना करू शकत नाही- अखिलेश यादव
14:02 (IST) 30 Jan 2017
शिवसेनेला सर्व ठिकाणी पारदर्शकता हवी, अनिल परब यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर